Health Care Tips : वजन कमी करण्यासाठी नियमित चालणे गरजेचे असते. पण नियमित चालणाऱ्यांना चालण्यात बदल हवा असेल तर इंटरव्हल वॉकिंगचा पर्याय सर्वोत्तम आहे. वजन कमी करणे ही एक कठीण प्रक्रिया आहे. निरोगी आरोग्यासाठी दररोज चालणे गरजेचे आहे.
वजन कमी करण्यासाठी इंटरव्हल वॉकिंग कसे करावे?
इंटरव्हल ट्रेनिंग हा फिटनेसची उद्दिष्टे साध्य करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. इंटरव्हल वॉकिंगसाठी स्मार्ट घड्याळाची आवश्यकता आहे. चालण्याआधी पाच मिनिटे वॉर्मअप करावा. त्यानंतर हळूहळू चालावे. असे केल्याने शरीर उबदार राहते. यानंतर एका मिनिटात सुमारे 100 पावले चालण्याचा निर्णय घ्या. यावेळी, खोल श्वास घ्या. चालताना तुमचा श्वास नॉर्मल राहील हे लक्षात ठेवा.
हा वर्कआऊट तुम्ही अर्धा तास करू शकतात. सुरुवातीला 5 मिनिटे वॉर्म अप करावा. त्यानंतर 5व्या ते 7व्या मिनिटाला जलद चालावे. 7व्या ते 8व्या मिनिटाला लाइट वॉक, 8व्या ते 10व्या मिनिटाला शक्य तितक्या वेगाने चालणे. नंतर 10व्या ते 11व्या मिनिटापर्यंत हळू चालत जा. त्यानंतर, 11 ते 13 व्या मिनिटापर्यंत वेगाने चालत जा. त्यानंतर 13-14व्या मिनिटाला हलके चालावे. 15 मिनिटांनंतर, ते आणखी हलके करा. मग हळूहळू चालणे वाढवा. 25 व्या ते 30 व्या मिनिटात, अतिशय हलके चालताना हळू हळू थांबा.
हिवाळ्यात मॉर्निंग वॉकला जाण्याचा कंटाळा येत असतो. पण उत्तम आरोग्यासाठी मॉर्निंग वॉक आवश्यक आहे. हिवाळ्यात हेल्दी राहण्यासाठी प्रत्येकजण कोणती ना कोणती फिजिकल अॅक्टिव्हिट करतात. काही लोक आपल्या फिजिकल अॅक्टिव्हिटीमध्ये मॉर्निंक वॉकचा समावेश करतात. जे लोक मॉर्निंग वॉक करण्याला पसंती देतात ते थंडीच्या दिवसातही ही सवय कायम ठेवतात.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
संबंधित बातम्या
कानात वारंवार खाज येते? काळजी करू नका, 'हे' उपचार करा
Health Tips : यकृताच्या आरोग्याची चिंता सतावतेय? ‘ही’ फळे खा अन् टेन्शन विसरा!
Weight Loss Tips : वजन कमी करायचंय? मग, आहारात नक्की सामील करा ‘ही’ फळं आणि भाज्या!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha