Soaked Peanuts Health Benefits: ड्राय फ्रुट्स (Dried Fruit) म्हणजेच, सुका मेवा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. शरीराला झटपट उर्जा देण्यासाठी आणि त्वचेचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी ड्रायफ्रूट्स अत्यंत गुणकारी ठरतात. ड्रायफ्रुट्समध्ये समाविष्ठ होणारी पोषक तत्व आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. पण, महाग असल्यानं ड्रायफ्रुट्सचा आहारात समावेश करणं सर्वांना परवडतंच असं नाही. अशातच गोरगरिबांना परवडणारं आणि पोषक तत्वांची खाण असणाऱ्या शेंगदाण्यांबाबत (Peanuts) मात्र कोणीच बोलत नाही. शेंगदाणा (Benefits of Soaked Peanuts) म्हणजे, पोषक तत्वांची खाण. आरोग्यासाठी शेंगदाण्याचे एक ना अनेक फायदे आहेत. 


शेंगदाणे खाण्याचे फायदे काय ? (Health Benefits Of Eating Groundnuts Soaked In Water)


शेंगदाणे म्हणजे, भुईमुगाच्या बिया. हेल्दी फॅट्स आणि इतर न्यूट्रिएंट्सचा भंडार म्हणजे, शेंगदाणा. एवढुशा शेंगदाण्यात व्हिटॅमिन ई व्यतिरिक्त मुबलक प्रमाणात प्रोटीन असतात. डाएटरी फायबर, पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी आणि फॉस्परस शेंगदाण्याच्या लहान दाण्यांमध्ये आढळतात. शेंगदाण्यांमध्ये हाय कॅलरी असतात. त्यामुळे शेंगदाण्यांचं सेवन केल्यानं लगेच ताकद मिळते आणि अशक्तपणा दूर होतो. 


थंडीत शेंगदाण्यांचं सेवन करणं फायदेशीर ठरतं. शेंगदाण्यांचा उष्मांक उच्च असल्यामुळे थंडीपासून बचाव करण्यासाठी फायदेशीर ठरतात. जर तुम्ही संधिवाताच्या समस्येनं त्रस्त असाल तर शेंगदाणे तुमच्यासाठी वरदान ठरतील. शेंगदाणे संधीवाताचा त्रास कमी करण्यासाठी मदत करतात. 


शेंगदाणे खाण्याचे काही इतर फायदे (Benefits of Soaked Peanuts)



  • शेंगदाणे खाल्ल्यानं शरीरात ब्लड सर्क्युलेशन वेगानं होतं. 

  • शरीरात सूज किंवा इंफ्लेमेशन कमी करण्यासाठी शेंगदाणे फायदेशीर ठरतात. 

  • शेंगदाण्यांमध्ये आढळणारे हेल्दी फॅट्स बॅड कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी करण्याचं काम करतात. 

  • शेंगदाणे हृदयाचं आरोग्य राखण्यासाठीही फायदेशीर ठरतात. 


शेंगदाणे खाण्याची योग्य पद्धत कोणती? 


साधारणतः लोक शेंगदाणे भाजून (Roasted Peanuts) किंवा उकडून (Boiled Peanuts) खातात. परंतु, शेंगदाणे पाण्यात भिजवून खाल्ल्यानं शरीराला त्याचे अनेक चमत्कारिक फायदे होतात. विशेषतः डायजेस्टिव्ह सिस्टमशी निगडीत समस्यांवर भिजवलेले शेंगदाणे खाणं हा अत्यंत लाभदायक उपाय मानला जातो. 


भिजवलेल्या शेंगदाण्यांचं सेवन कधी करावं? 


एक वाटी शेंगदाणे अर्धा लीटर पाण्यात भिजत ठेवा. काही तास शेंगदाणे पाण्यात भिजत ठेवा. पुढच्या दिवशी नाश्त्यामध्ये भिजवलेले शेंगदाणे खा. 


(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)


महत्त्वाच्या इतर बातम्या :


पीरियड्समध्ये पेनकिलर खाव्यात की नाही? जाणून घ्या, फायदे अन् तोटे!