Thick hair After The Age Of 50 : धकाधकीच्या जीवनशैलीचा (Stressful Lifestyle) परिणाम आरोग्यावर होतोच, त्यासोबतच सौंदर्यावरही त्याचा परिणाम होतो. त्वचेच्या आरोग्यासोबतच केसांच्या आरोग्यावरही परिणाम होतो. तसेच, वाढत्या वयामुळेही केसांचं आरोग्य बिघडतं, केस गळतात, केसांची वाढ खुंटते. वयानुसार तुमचेही केस निस्तेज (Hair Care Tips) आणि कोरडे होतायत? तुम्ही तुमचे दाट केस गमावत आहात? जर तुमचं उत्तर होय असेल, तर अशा परिस्थितीत तुम्हाला जास्त काळजी करण्याची गरज नाही.
वाढत्या वयाबरोबर, शरीरातील अनेक पोषक तत्वांची कमतरता, ताणतणाव आणि केसांना पोषक नसल्यामुळे तुमचे केस खूप निर्जीव होऊ शकतात. अशा परिस्थितीत तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. काही सोप्या उपायांचा अवलंब करून तुम्ही तुमचे केस पूर्वीसारखे चमकदार, मुलायम करू शकता. जर तुम्हाला वयाच्या पन्नाशीनंतरही तुमचे केस जाड आणि सुंदर ठेवायचे असतील, तर तुम्ही यासाठी काही सोप्या टिप्स फॉलो करू शकता.
तुम्हाला वयाच्या पन्नाशीनंतरही तुमचे केस जाड आणि सुंदर ठेवायचे असतील तर तुम्ही यासाठी काही सोप्या टिप्स फॉलो करू शकता. जाणून घेऊयात सविस्तर...
केसांना गरम तेलानं मसाज करा (Hot Oil Massage To Hairs)
वयाच्या पन्नाशीनंतर केस जाड आणि मऊ ठेवण्यासाठी, तुम्हाला आठवड्यातून किमान दोनदा नियमितपणे गरम तेलानं केसांच्या मुळांशी मालिश करण्याची आवश्यकता आहे. केसांच्या मुळांना मसाज करण्यासाठी खोबऱ्याचं तेल किंवा मोहरीचे तेल वापरा. यामुळे तुमच्या केसांना आवश्यक ते पोषण मिळेल. तेल आणखी पोषक करण्यासाठी त्यात थोडी आवळा पावडर किंवा मेथी पावडर मिसळा आणि तयार झालेल्या मिश्रणाच्या मदतीनं केसांच्या मुळांना मसाज करा.
होममेड अवोकाडो हेअर मास्क (Homemade Avocado Hair Mask)
तुमच्या केसांना संपूर्ण पोषण देण्यासाठी आठवड्यातून किमान एकदा किंवा दर 15 दिवसांनी हेअर मास्क लावा. हेअर मास्क लावल्यानं केसांची वाढ मोठ्या प्रमाणात होऊ शकते. यासाठी अर्धा अवोकाडो घ्या, त्यात थोडं मध मिसळा आणि एक पेस्ट तयार करा. तयार झालेली पेस्ट केसांच्या मुळांना लावून मसाज करा. सुमारे 30 मिनिटांनंतर, सौम्य शॅम्पूच्या मदतीनं केस धुवा. केस धुण्यासाठी थंड पाण्याचा वापर करा.
आहारावरही लक्ष द्या (Healthy Diet)
केसांची वाढ होण्यासाठी आणि दाट केसांसाठी तुमचा आहारही सकस असणं अत्यंत आवश्यक आहे. शरीराला आवश्यक ते पोषक घटक मिळाल्यानं आरोग्य सुधारतं. त्यासोबत केसांचंही आरोग्य सुधारतं. त्यामुळे आहारात पोषक पदार्थांचा समावेश करा. तसेच, बाहेरचे पदार्थ, जंक फूडऐवजी घरात तयार केलेले पदार्थ खा. आपल्या आहारात फळं आणि हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा. बाहेरचे जंक फूड, साखर आणि जास्त मीठ खाऊ नका.
ताण-तणावापासून दूर राहा
केस गळण्यामागे तणाव हे मुख्य कारण असू शकतं. त्यामुळे तणावापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. ताणतणाव किंवा कोणत्याही प्रकारची मानसिक समस्या केवळ शारीरिक समस्या निर्माण करत नाही, तर केस आणि त्वचेवरही परिणाम करते. अशा परिस्थितीत तणाव आणि चिंता यांसारख्या गोष्टींपासून अंतर ठेवण्याचा प्रयत्न करा. यासाठी योगासनं, ध्यानधारणा आणि योग्य खाण्याच्या सवयींची मदत घ्या.
केसांची निगा राखा
वयाच्या पन्नाशीनंतर केसांची काळजी घेणं गरजेचं असतं. या वयात अनेक महिला त्यांच्या केसांकडे दुर्लक्ष करू लागतात. तुमचे केस सुंदर व्हायचे असतील, तर यासाठी योग्य शॅम्पू, तेल आणि कंगवा वापरा.
(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)
महत्त्वाच्या इतर बातम्या :