Health Benefits Of Grapes: आता तुम्ही बाजारात गेलात, तर हिरवी-काळी द्राक्षं (Grapes Benefits For Health) मुबलक प्रमाणात दिसतील. द्राक्षं (Grapes Benefits) तशी खाण्यास अत्यंत चविष्ट तर आहेतच, शिवाय पोषक तत्वांनीही भरपूर मानली जातात. द्राक्षांचं सेवन करणं आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानलं जातं. द्राक्षं अतिशय रसाळ आणि गोड असतात. प्रामुख्यानं हिरव्या आणि काळ्या रंगात द्राक्षं आढळतात. रंगानुसार, द्राक्षांमध्ये आढळून येणारी पोषक तत्वही वेगवेगळी असतात. द्राक्षांमध्ये व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, कॅल्शियम असे अनेक पोषक घटक आढळतात. त्यात फ्लेव्होनॉइड्स आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म देखील असतात. जे आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांपासून बचाव करतं.
द्राक्षं खाण्याते हे फायदे तुम्हाला माहीत असायलाच हवे
हृदयाचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी फायदेशीर (Beneficial For Heart)
तुम्ही जे खाताय त्याचा हृदयाच्या आरोग्यावरही परिणाम होत असतो. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या आहारात द्राक्षांचा समावेश जरूर करा. हे हृदयाच्या आरोग्यास प्रोत्साहन देतं. पॉलीफेनॉल, पोटॅशियम आणि अॅन्टी इंफ्लेमेटरी गुणधर्म द्राक्षांमध्ये आढळतात. जे हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी मदत करतात.
डोळ्यांची दृष्टी सुधारते (Improves Eye Sight)
द्राक्षं खाल्ल्यानं दृष्टी सुधारते. द्राक्षांचा आहारात नियमित समावेश केल्यास डोळ्यांचे आजार टाळता येतात. त्यामध्ये ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन आढळतात, जे फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून डोळ्यांचे संरक्षण करतात.
बद्धकोष्ठतेपासून आराम देण्यात प्रभावी (Effective In Relieving Constipation)
द्राक्षांमध्ये फायबर आणि पाण्याचं प्रमाण जास्त असतं. जर तुम्ही बद्धकोष्ठतेच्या समस्येनं त्रस्त असाल तर तुमच्यासाठी द्राक्ष हे सर्वोत्तम फळ आहे. हे आतड्याची हालचाल सुलभ करतं, ज्यामुळे तुम्ही बद्धकोष्ठतापासून मुक्ती मिळू शकते.
किडनीसाठी फायदेशीर (Beneficial For Kidneys)
द्राक्षांमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म भरपूर असतात. जे किडनीसाठी फायदेशीर मानले जातात. किडनीशी संबंधित अनेक आजार बरं करण्यासाठी द्राक्ष गुणकारी आहेत.
त्वचेसाठी फायदेशीर (Skin Care Tips)
द्राक्षांमध्ये असलेलं रेसवेराट्रोल त्वचेसाठी खूप फायदेशीर मानलं जातं. जर तुम्हाला मुरुमांची समस्या असेल तर रोजच्या आहारात द्राक्षांचा समावेश करा. यामुळे त्वचेशी संबंधित समस्या कमी होतात.
(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)
महत्त्वाच्या इतर बातम्या :
शेंगदाणे नुसते नका खाऊ, पाण्यात भिजवून खा; आरोग्याच्या सर्वच समस्यांवर रामबाण उपाय!