Health Care Tips : हिवाळ्यात (Winter) फ्लू (Flu) किंवा इतर संसर्ग झपाट्याने पसरतात. अशा परिस्थितीत शरीर निरोगी ठेवण्यासाठी चांगली प्रतिकारशक्ती असणे आवश्यक आहे. हिवाळ्यात, लोक फळांचे सेवन खूप कमी करतात, ज्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती देखील प्रभावित होते. हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी तुम्ही 'या' फळांचा तुमच्या आहारात समावेश केल्याने तुम्हाला निरोगी राहण्यास मदत होईल.


1. पपई


पपई मध्ये प्रचंड उष्णता असते. त्यामुळे हे फळ थंडीत खाल्ल्याने शरीरात उष्णता तयार होण्यास मदत होते. ज्यामुळे तुमची प्रतिकारक्षमता चांगली राहते. पपईचे खाल्ल्यास थकवा कमी होण्यास मदत होते. तसेच व्हिटामिन सी शरीरातील हार्मोन्सचे प्रमाण संतुलित राखते.


2. चिकू


चिकूमधून भरपूर ऊर्जा मिळते. चिकूमध्ये व्हिटामिन ए चे प्रमाण अधिक असते. त्यामुळे थंडीत हे फळ खाणे फायदेशीर आहे. चिकू खाल्ल्यानं पित्ताशय चांगलं राहातं. इतकच नाही तर रोगप्रतिकारकशक्ती वाढते. नियमितपणे चिकू सेवन केल्याने स्नायू आणि हाडे मजबूत राहतात 


3. अननस


अननसामध्ये व्हिटामीन सी चे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे तुम्हाला एखाद्या गोष्टीची एलर्जी झाल्यास अननसाचे सेवन करणे फायदेशीर ठरते. अननसमधील विटामीन सी स्कीन इलास्टिसिटी वाढवते आणि त्वचा सुंदर बनवते. २) अननसमधील ब्रोमेलीन एंजाईम पचनशक्ती सुधारते. अननस संधीवात सारख्या आजारावरही खूप गुणकारी आहे.


4. अंजीर


अंजीरातील कॅल्शिअम हाडांसाठी अत्यंत महत्वाचे आहे. तसेच वजन कमी करण्यासाठी या फळाची खूप मदत होते. अंजीरामधील तंतुमय पदार्थामुळे पोट साफ होण्यास फायदा होतो. अंजीरामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते. 


5. मोसंबी


मोसंबीत सर्वाधिक फायबर असते जे शरीराला महत्वाचे असते. नियमित मोसंबी खाल्याने रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीत होण्यास मदत मिळते.मोसंबीने श्वसनाचा त्रास कमी होतं. तसेच सूज कमी करण्यासाठी देखील गुणकारी आहे. हिवाळ्यात संधीवाताची समस्या अनेकदा निर्माण होते. अशा वेळी मोसंबी खाणे फायद्याचे ठरते. मोसंबीचे नियमित सेवन केल्यास त्वचा, केस आणि डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते. 


6. सफरचंद
सफरचंदाचा हंगाम हिवाळ्यात असतो. रोज सफरचंद खाल्ल्याने शरीर आजारांपासून दूर राहते. सफरचंद खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. यामुळे जळजळ होण्याची समस्या कमी होते. सफरचंदांमध्ये भरपूर फायबर, जीवनसत्त्वे सी आणि के असतात.


7. डाळिंब
थंडीच्या दिवसात डाळिंबाचाही हंगाम असतो. तुम्ही रोज एक डाळिंब खाऊ शकता. डाळिंब खाल्ल्याने शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते. डाळिंब रक्त पातळ करते, ज्यामुळे रक्तदाब, हृदय, वजन कमी आणि त्वचा निरोगी राहण्यास मदत होते.


8. पेरू
पेरूचा हंगाम हिवाळ्यात येतो. थंडीमुळे अनेकजण पेरू खात नसले तरी. पेरूमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट घटक आढळतात, ज्यामुळे आपले शरीर कोणत्याही संसर्गाशी लढण्यासाठी तयार होते. दिवसा उन्हात पेरू खाऊ शकता.


9. संत्री
संत्रे हे व्हिटॅमिन सी आणि कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहे. संत्री खावीत. हिवाळ्यात उन्हात बसून संत्री खाल्ल्याने तुमचे नुकसान होणार नाही. संत्रा शरीर आणि रोगप्रतिकार शक्ती मजबूत करते.


10. स्टॉबेरी
हिवाळ्यात बाजारात सहजपणे उपलब्ध होणारे फळ म्हणजे स्टॉबेरी. थंडीच्या हंगामात स्टॉबेरीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. स्टॉबेरी रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यास मदत करते. तजेलदार आणि नितळ चेहऱ्यासाठी स्टॉबेरी उपयुक्त आहे.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
https://www.youtube.com/watch?v=Rs3GfkHRwXA