Hair Care Tips: तणाव आणि वाढते प्रदूषण तुमच्या केसांचे नुकसान करत आहेत. केसांच्या गळतीला रोखण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे उपायही करता परंतु काही उपायांचा केसांवर काही परिणाम होत नाही. पण, कदाचित तुम्हाला माहित नसेल की, केसांच्या गळतीमागे काही पदार्थसुद्धा जबाबदार होऊ शकतात. होय, तुमच्याद्वारा निवडले गेलेले पदार्थ केसांना नुकसानदेखील पोहोचू शकतात. हे केसांच्या पातळ होण्याच्या समस्येवर भरही देऊ शकतात. तर तेच तुमच्या केसांची वाढही रोखू शकतात. जर तुम्हीही केसांच्या गळतीपासून त्रस्त असाल तर आता तुम्हाला त्रस्त होण्याची गरज नाही. कारण आम्ही आता तुम्हाला अशा काही पदार्थांची नावं सांगणार आहोत ज्यापासून तुम्ही दूर राहिले पाहिजे. 


अल्कोहोल (Alcohol)- केस मुख्यत्वे कॅरेटिन नामक प्रोटीनने बनलेले असतात. कॅरेटिन हे एक प्रोटीन आहे जे तुमच्या केसांना नीट राहण्यासाठी मदत करतात. तर तेच मद्यपानचे प्रोटीन नकारात्मक प्रभाव पाडतात आणि यामुळे केस कमकुवत होतात तसेच केसांची चमकही निघून जाते. तर तेच जास्त अल्कोहोल घेतल्यानेसुद्धा तुम्ही डीहायड्रेट होऊन जाता ज्यामुळे तुमच्या केसांवर त्याचा वाईट परिणाम होतो. 


डाएट सोडा (Diet Soda)- डाएट सोडामध्ये एस्पार्टेम नामक कृत्रिम स्वीटनर असतात जे केसांच्या मुळांना नुकसान पोहोचू शकतात. जर तुम्ही नुकतेच केस गळतीच्या समस्येला सामोरे जात असाल तर तुमच्या आहारात डाएट सोड्याचा समावेश करू नका. 


साखरेचे पदार्थ (Sugary Foods)- साखर ही केसांच्या गळतीला एक सर्वात मोठे कारण होऊ शकते. साखर तुमच्या तब्येतीला नुकसान पोहोचवण्याबरोबरच केसांसाठीसुद्धा चांगली नसते. प्रोटीन तुमच्या केसांसाठी फार महत्वाचे आहे आणि साखर  शोषण्यात अडथळा आणते. यासाठी साखरेला तुमच्या आहारापासून दूरच ठेवा.


हे ही वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha