Home Remedy For Hair Growth: काळे कुळकुळीत आणि लांबसडक केस (Hair Health) असावेत, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. मग त्यासाठी सुरू होते लगबग. मार्केटमधले प्रोडक्ट्स, घरगुती उपाय, डॉक्टरांचे सल्ले आणि मित्रमैत्रिणींचं ऐकून एक नाही अनेक उपाय सर्रास केले जातात. पण काळ्या, लांबसडक केसांचं (Black Hairs) स्वप्न असंच पूर्ण होत नाही. त्यासाठीही तुम्हाला मेहनत घ्यावी लागते, केसांची काळजी घ्यावी (Tips For Hair Growth) लागते. आता तुम्ही म्हणाल, आम्ही केसांना तेल लावून मालीश करतो. पण तरिही केस अफाट गळतात. तसेच, केस गळण्यासोबतच केसांत कोंडा, केसांना फाटे फुटणं यांसारख्या समस्याही उद्भवतात. मग अशावेळी काय कराल? तर अशावेळी केसांना योग्ये वेळी योग्य पोषक तत्व पुरवणं आवश्यक असतं. 


केसांचं आरोग्य (Hair Care) उत्तम राखण्यासाठी घरगुती उपाय फायदेशीर ठरतातच, पण त्यासाठी नैसर्गिक (Home Remedies) किंवा आयुर्वेदिक पदार्थांचा (Natural Ingredients) वापर करणं अधिक फायदेशीर ठरतं. या घरगुती उपायांमध्ये एका खास तेलाचा वापर तुम्ही करु शकता. आजीबाईच्या बटव्यात समाविष्ट होणाऱ्या पदार्थांचा यामध्ये समावेश होतो. हे तेल तयार करण्यासाठी मोहरीचं तेल (Musturd Oil), बदामाचं तेल (Badam Oil) आणि मेथी या तीन गोष्टींची आवश्यकता आहे. हे तेल तुमच्या केसांसाठी नक्कीच वरदान ठरेल. 




कसं तयार कराल तुमच्या केसांसाठी तेल? 


काय साहित्य लागेल?



  • मोहरीचं तेल

  • कढीपत्ता

  • रोजमेरीची पानं 

  • कसूरी मेथी 

  • बदामाचं तेल 

  • एरंडेल तेल 


तेल कसं तयार कराल?


सर्वात आधी एका पातेल्यात मोहरीचं तेल घेऊन गरम करा. आता यामध्ये एक एक करुन कढीपत्ते, रोजमेरीची पानं, कसूरी मेथी, बदामाचं तेल आणि एरंडेल तेल टाका. तेलाचा रंग गडद झाल्यावर गॅस बंद करा आणि त्यानंतर थंड करुन घ्या. त्यानंतर तयार झालेलं तेल एका काचेच्या बाटलीत स्टोअर करा. आता तुम्ही जेव्हा पाहिजे तेव्हा केसांना लावू शकता. 


मोहरीच्या तेलात अल्फा फॅटी अॅसिडसारखी पोषक तत्त्व आढळून येतात. ही पोषक तत्व केस मुलायम करण्यासाठी केस तुटण्यापासून रोखण्यासाठी फायदेशीर ठरतात. एका रिसर्चमधून समोर आलेल्या निष्कर्षानुसार, जर मेथीचे दाणे आणि रोजमेरीची पानांचा अर्क केसांना लावला तर केसांच्या मुळांना आवश्यक ती पोषक तत्व मिळतात. तसेच, ब्लड सर्कुलेशनसाठीही उपयुक्त ठरतात. यामुळे केसांची वाढ होते. मेथीच्या दाण्यांमध्ये प्रोटीन असतं, जे केसांची मुळं बळकट करण्यासाठी मदत करतं. यामुळे केस लांबसडक होण्यासही मदत होते. जर तुम्ही कढीपत्ता सोबत वापरलात तर त्यामध्ये असलेलं प्रोटीन आणि बीटा-कॅरोटीन तुमच्या केसांना मुळांपासून मजबूत करण्यास मदत करतं.


(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Weight Loss Tips : सगळे म्हणतात, जिऱ्याचं पाणी प्या, वजन कमी होईल; पण खरंच असं होतं का?