Health Tips : आतड्यातील (Intestine) सामान्य बॅक्टेरियामुळे (Bacteria) अल्जाइमर (Alzheimer) आजाराचा धोका वाढू शकतो. जगातील दोन तृतीयांश लोकांमध्ये असलेल्या आतड्यांतील सामान्य जीवाणू अल्झायमर रोगाचा धोका वाढवू शकतात. आतड्यातील सामान्य बॅक्टेरिया (Gut Health) काढून टाकल्याने अल्झायमर आजारापासून सुटका मिळू शकते. साधारणपणे दोन तृतीयांश लोकांच्या आतड्यांतील सामान्य जीवाणू अल्झायमरच्या संभाव्य धोक्याचं कारण ठरू शकतात. संशोधनात ही बाब समोर आली आहे.


सामान्य बॅक्टेरियामुळे अल्जाइमरचा धोका वाढतो


हेलिकोबॅक्टर पायलोरी (H Pylori) या संसर्गामुळे 50 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींमध्ये अल्झायमर रोगाचा धोका वाढतो की नाही हे शोधण्याचा प्रयत्न या एका अभ्यासात करण्यात आला. या संदर्भातील अहवाल अल्झायमर आणि डिमेंशिया : द जर्नल ऑफ द अल्झायमर असोसिएशनमध्ये प्रकाशित करण्यात आला. सामान्य आजारांमुळे पोटाचा कर्करोग, जठराची सूज, अल्सर आणि अपचन होऊ शकते, असंही या अहवालात सांगण्यात आलं आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, अल्झायमर रोगासाठी पोटाचं आरोग्य फार महत्त्वाचं असल्याचं या अभ्यासात समोर आलं आहे. आतड्यातील जीवाणूचा मेंदूच्या आरोग्यावरही परिणाम होतो हेही स्पष्ट झालं आहे.


संशोधनात काय समोर आलं?


मॅकगिल विद्यापीठातील संशोधकांच्या पथकाने ब्रिटनमधील 4 दशलक्षाहून अधिक प्रौढ व्यक्तींच्या आरोग्यासंबंधित माहितीचा सखोल अभ्यास केला. यावरून वैज्ञानिकांका आढळून आलं की, एच. पायलोरी संसर्गाची लक्षणे असलेल्या लोकांमध्ये 11 टक्के लोकांना अल्झायमर झाला होता. यानुसार, हेलिकोबॅक्टर पायलोरी (H Pylori) जिवाणू संसर्गामुळे अल्झायमर रोगाचा धोका वाढतो, असं समोर आल्याचा दाव संशोधकांनी केला आहे.


अल्झायमर रोगाचा प्रभाव टाळण्यासाठी प्रयत्न


या संशोधनामुळे अल्झायमर आजारावरील पुढील संशोधनासाठी मार्ग मोकळा झाला आहे. हेलिकोबॅक्टर पायलोरी (H Pylori) या जीवाणूचा नाश केल्याने काही लोकांमध्ये अल्झायमर रोग प्रभावीपणे टाळता येऊ शकतो का हे शोधण्याचा संशोधकांचा प्रयत्न आहे. जगभरात लाखो लोकांना अल्झायमर आजाराचा सामना करावा लागलो. भविष्यात ही समस्या दूर करत लोकांना आराम देण्यासाठी संशोधन सुरु आहे. या संशोधनाच्या अहवालावरून, अल्झायमरचा संसर्ग कमी करण्यासाठी प्रतिबंधक उपाय शोधण्याचा वैज्ञानिकांचा प्रयत्न आहे.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Covid-19 in India : JN.1 व्हेरियंट संसर्गाचा वेग वाढला! 'ही' लक्षणे दिसताच दुर्लक्ष करु नका; AIIMS च्या सूचना