Guava Leaves Benefits : फळे (Fruits) आरोग्यासाठी (Health Tips) उत्तम असतात, पण काही फळांची पानेही अतिशय लाभदायी असतात. ज्याच्या सेवनामुळे विविध आजारांपासून सुटका होऊ शकते. पेरू (Peru) तुम्ही अनेकदा खाल्ला असेल पण तुम्ही कधी याच्या पानांचा आहारात समावेश केला आहे का? पेरूप्रमाणे (Guava) पेरूची पाने (Guava Leaves) आरोग्यासाठी लाभदायी आहेत पेरुच्या पानांचे एक नाही तर अनेक फायदे आहेत. पेरुच्या पानांमध्ये अँटी-ऑक्सिडेंटसह भरपूर खनिजे असतात, जी शरीरासाठी आवश्यक असतात. पेरुच्या पानांमध्ये फायबर पोटॅशिअम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असतात, त्यामुळे याचा शरीराला फायदा होतो. तुम्ही पेरुच्या पानांचे सेवन केल्यास अतिशय फायदेशीर ठरेल. पेरुच्या पानांचा चहा बनवून तुम्ही त्याचं सेवन करु शकता.


Guava Leaves Benefits : पेरुच्या पानांचं सेवन करण्याचे फायदे


Immunity : रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते


पेरूच्या पानांचा चहा प्यायल्याने शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत होते. त्यातील व्हिटॅमिन सी गुणधर्म आणि अँटी-ऑक्सिडंट्स शरीराला रोगांपासून वाचवतात आणि शरीराला हानी पोहोचवणारे वाईट बॅक्टेरिया आणि मुक्त रॅडिकल्स नष्ट करण्यास देखील मदत करतात.


Blood Sugar : रक्तातील साखर नियंत्रित होते


रक्तातील साखरेची वाढ (Blood Sugar) आणि घट यामुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्या निर्माण होतात. पेरूच्या पानांचा चहा रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त आहे, त्यामुळे या चहालाही आहाराचा भाग बनवता येतो.


Weight Loss : वजन कमी करण्यास उपयुक्त


पेरूच्या पानांचा चहाही वजन कमी (Weight Loss)करण्यासाठी खाऊ शकतो. या पानांचा चहा प्यायल्याने कार्बोहायड्रेट्सचे शोषण कमी होते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.


Reduces Stress : तणाव कमी होतो


तणाव कमी करण्यासाठी पेरूचा चहा देखील सेवन केला जाऊ शकतो. तुम्हाला दिवसभर तणाव किंवा थकवा वाटत असेल, डोकेदुखी असेल आणि काय करावे हे कळत नसेल, तेव्हा पेरूचा हर्बल चहा पिण्याचा प्रयत्न करा, यामुळे तुम्हाला तणावातून आराम मिळेल.


How to Consume Guava Leaves : पेरूच्या पानाचे सेवन कसं करावं?


तुम्ही पेरुच्या पाने चाऊन खावू शकता किंवा तुम्ही त्याचा रस काढून पिऊ शकता. याशिवाय तुम्ही पेरुच्या पानांचा चहा बनवून त्याचंदेखील सेवन करु शकता.


Benefits Of Drinking Guava Leaves Tea : पेरूच्या पानाच्या चहाचे फायदे


पेरूच्या पानांपासून चहा बनवण्यासाठी पेरूची पाने गरम पाण्यात शिजवून ते पाणी पिऊ शकता. पेरूची पाने वाळवून तुम्ही त्याचा चहापत्तीप्रमाणे वापर करुन चहा बनवू शकता. पेरूच्या पानांपासून बनवलेल्या हर्बल चहामुळे शरीराला भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे मिळतात. पेरुच्या पानांचा हर्बल चहा सुगंधी आणि तितकाच आरोग्यादायी आहे.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Uric Acid : हिवाळ्यात 'या' 7 पदार्थांपासून दूर राहा! युरीक ॲसिड वाढण्याचा धोका, हदय आणि किडनी संबंधित गंभीर आजारांना आमंत्रण