Health Tips : शरीरात यूरिक ॲसिड (Uric Acid) जमा होणे अत्यंत धोकादायक मानले जाते. शरीरातील रक्तातील युरिक ॲसिडचे प्रमाण वाढल्यास सांधेदुखी, किडनीचे आजार, हृदयविकाराचा झटका हे धोकादायक आजार होण्याचा धोका वाढतो. अनेक वेळा युरिक ॲसिड शरीरात क्रिस्टल्सचे रूप घेते आणि हळूहळू सांध्याभोवती जमा होऊ लागते. त्यामुळे सांधेदुखीच्या समस्येला सामोरे जावे लागते. जर तुमच्या शरीरात युरिक ॲसिडची पातळी वाढली असेल, तर तुम्ही तुमच्या आहाराची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. विशेषतः हिवाळ्यात युरीक ॲसिड वाढण्याची समस्या जास्त उद्भवते त्यामुळे या काळात खाण्याच्या सवयींकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे.
युरीक ॲसिड म्हणजे काय?
यूरिक ॲसिड म्हणजे शरीरातील कचरा. जेव्हा प्युरिन नावाची रसायने तुटतात तेव्हा यूरिक ॲसिड तयार होते. प्युरीन्स हा शरीरात आढळणारा एक नैसर्गिक पदार्थ आहे. प्युरीन्स यकृत, शेलफिश आणि अल्कोहोल सारख्या अनेक पदार्थांमध्ये देखील आढळते.
हिवाळ्यात युरीक ॲसिड वाढण्याची समस्या टाळण्यासाठी 'या' पदार्थांपासून दूर राहणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे. हे पदार्थ कोणते जाणून घ्या.
मांस
हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवण्यासाठी लोकांना मांस खायला आवडतात. पण काही प्रकारचे मांस तुमच्या शरीरातील यूरिक ॲसिडची पातळी वाढवण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळे हिवाळ्यात लाल मांस खाणं टाळा.
सीफूड
काही प्रकारचे सीफूड तुमच्या शरीरातील यूरिक ॲसिडची पातळी वाढवू शकतात. त्यामुळे सी फूड खाण्यापूर्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास धोका टाळता येईल.
मनुका
मनुका हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात, पण मनुका युरिक ॲसिडच्या रुग्णांसाठी धोकादायक ठरू शकतात.
खजूर
खजूर हे कमी प्युरीन असलेलं फळ आहे. खजुरामध्ये फ्रक्टोजचे प्रमाण जास्त असते. हिवाळ्यात जास्त खजूर खाणं चांगलं नाही. यामुळे तुमच्या रक्तातील फ्रक्टोजचे प्रमाण वाढल्यास गंभीर आजारांना आमंत्रण मिळू शकते.
चिकू
चिकूलाही फ्रक्टोज मानलं जातं. त्यामुळे युरिक ॲसिड वाढण्याचा धोका टाळायचा असल्यास चिकूचं सेवन करणं टाळा.
बीट
हिवाळ्यात बीटचे भरपूर सेवन केले जाते. पण बीटध्ये असे अनेक घटक आढळतात जे शरीरातील यूरिक ॲसिडची पातळी वाढवू शकतात.
मिठाई
जास्त साखरयुक्त पदार्थ देखील शरीरातील यूरिक ॲसिडची पातळी वाढवू शकतात. मिठाईमध्ये साखरेचे प्रमाण खूप जास्त असते. गोड पदार्था खाल्ल्याने युरिक ॲसिड वाढते, यामुळे गंभीर आजारांना आमंत्रण मिळू शकते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :