Health Benefits Of Green Chilli : हिरव्या मिरचीचा ठेचा अनेकांना खायला आवडतो. तसेच वडापावसोबत जर मिरची नसेल तर वडापाव खायला मजा येत नाही. हिरवी मिरची ही आरोग्या अत्यंत फायदेशिर असते. तसेच हिरव्या मिरचीमध्ये अँटिऑक्सीडेंट्सचे प्रमाण देखील जास्त असते. जाणून घेऊयात हिरवी मिरचीचे फायदे...


हिरवी मिरची खाल्ल्याने त्वचेवर ग्लो येतो
हिरव्या मिरचीमध्ये व्हिटॅमिन-सी असते. तसेच बीटा-कॅरोटीन देखील हिरव्या रंगाच्या मिरचीमध्ये असते. या पोषक तत्वांमुळे त्वचेवर ग्लो येतो. 
 
हिरव्या मिरचीमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते. लोह हे शरीरातील रक्त प्रवाह योग्य रित्या होणास मदत करते. शरीरात रक्तप्रवाह सुरळीत झाल्यानं शरीर अॅक्टिव्ह राहते. जर शरीरात लोहाचे प्रमाण कमी असेल तर अशक्तपणा येतो. त्यामुळे जर तुम्हाला अॅक्टिव्ह रहायचे असेल तर तुम्ही हिरव्या मिरचीचा समावेश डाएटमध्ये केला पाहिजे. 
 
हिरव्या मिरचीमध्ये कॅप्सेसिन नावाचे कंपाउंड असते. जे डोक्याच्या भागात  असणारे हाइपोथेलेमसच्या कूलिंग सेंटरला अॅक्टिव्ह ठेवण्याचे काम करते. ज्यामुळे मेंदू तसेच शरीरातील काही भागाचे तापमान  नियंत्रित राहते. त्यामुळे भारतासारख्या उष्णता जास्त असणाऱ्या देशांमधील लोक हिरव्या मिरचीचे सेवन जास्त प्रमाणात करतात.  


रक्तामधील ग्लूकोजचे प्रमाण जर जास्त झासे तर  डायबिटीज होऊ शकते. त्यामुळे जर तुम्हाला ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवायची असेल तर तुम्ही हिरव्या मिरचीचा डाएटमध्ये समावेश केला पाहिजे. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha