Winter Health Tipsपाणी (Water) हा अतिशय आवश्यक घटक आहे. जीवनासाठी पाणी खूप महत्त्वाचं आहे. योग्य आणि सकस आहारासोबतच पाणी पिऊन शरीर हाटड्रेट (Hydrate) ठेवणंही तितकंच गरजेच आहे. जर तुम्ही योग्य प्रमाणात पाणी पिताय पण, तरीही तुम्हाला सारखी तहान लागत असेल, तर हे अनेक गंभीर आजारांचं लक्षण असू शकतं. विशेषत: हिवाळ्यामध्ये (Winter) जर तुम्हाला वारंवार तहान लागत असेल तर, याकडे दुर्लक्ष करु नका. 


तोंडात लाळेचा अभाव


तोंडात नेहमी लाळ किंवा थुंकी असावी. लाळ अनेक प्रकारचे सूक्ष्मजीव मारते. त्यामुळे संसर्गासंबंधीचे अनेक आजारांपासून बचाव होतो. पण जर तोंडात लाळेचे उत्पादन कमी होत असेल तर तोंड कोरडं होऊन त्यामुळे वारंवार तहान लागते. यामागे अनेक कारणे असू शकतात. काही औषधे खाल्ल्यानंतर तोंडात कमी लाळ तयार होते. त्याशिवाय कर्करोगासारख्या गंभीर आजारामुळे तोंडात कमी लाळ निर्माण होते. तोंडात लाळेचे उत्पादन कमी होत असेल तर ती चिंतेची बाब आहे.


अशक्तपणा


तुमच्या शरीरात अशक्तपणा असतो म्हणजेच रक्तामध्ये RBC आणि हिमोग्लोबिनची कमतरता असते, तेव्हा तुम्हाला सारखी तहान लागू शकते. रक्त कमी होण्याची अनेक कारणे असू शकतात. यासाठी व्हिटॅमिन बी 12 आणि लोहाची कमतरता असू शकते. यामुळे ॲनिमिया होतो. त्यामुळे शरीर खूप थकल्यासारखे आणि अशक्त वाटू लागते, यामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करू नका आणि वेळीच डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करा.


चक्कर येणे


कधी-कधी अनेक कारणांमुळे चक्कर येण्याची समस्या उद्भवू शकते. जर वारंवार चक्कर येण्याची समस्या असेल आणि तीव्र होत असेल तर त्यामुळे वारंवार तहान लागते. त्यामुळे चक्कर येण्यासोबतच पुन्हा-पुन्हा तहान लागल्यास याकडे दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.


कॅल्शियमचे प्रमाण वाढणे


तुम्हाला हायपरकॅल्सेमिया असला तरीही तुम्हाला पुन्हा पुन्हा तहान लागू शकते. Hypercalcemia म्हणजे तुमच्या शरीरात कॅल्शियमचे प्रमाण वाढणे. हायपरक्लेसीमियामुळे शरीराची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे पुन्हा पुन्हा तहान लागते.  हायपरकॅल्सेमिया असल्यास उपचार घेण्याची आवश्यकता असते


मधुमेह


जेव्हा रुग्णाला मधुमेह असतो, तेव्हा त्याला वारंवार तहान लागते. जेव्हा लघवीद्वारे ग्लुकोज बाहेर पडू लागते, तेव्हा शरीराची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता कमी होते आणि वारंवार लघवी करावी लागते. त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासते आणि त्यामुळे वारंवार तहान लागते.