Walking For Weight Loss : व्यायाम (Excercise) करणं शरीरासाठी चांगलं असतं, यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि आरोग्यही चांगलं राखलं जातं. पण, प्रत्येकाला दररोज व्यायाम करणं शक्य होत नाही, त्यामुळे काही जण व्यायाम करण्याऐवजी चालण्याला (Walk) प्राधान्य देतात. चालणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानलं जातं.  बहुतेक लोक सकाळी किंवा संध्याकाळी वॉकला (Walking) जातात. ही सवय आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. चालण्यामुळे शरीराला अनेक फायदे तर मिळतात, याशिवाय अनेक आजारांचा धोकाही कमी होतो. चालण्याने वजन नियंत्रणात ठेवण्यासही मदत होते. दरम्यान, अनेक जण रोज चालतात पण तरीही त्यांच्या वजनावर (Weight Loss) कोणताही परिणाम होत नाही. यामध्ये नक्की काय चूक होतेय, ते जाणून घ्या.


 रोज चालल्यानंतरही वजन का कमी होत नाही?


अमेरिकेच्या रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राने (CDC) दिलेल्या माहितीनुसार, जे लोक दररोज 8 ते 10 हजार पावले चालतात त्यांचे वजन नियंत्रणात राहतं. यामुळे कोलेस्ट्रॉल, रक्तदाब आणि रक्तातील साखरेसारख्या गंभीर समस्यांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होऊ शकते. चालणे हृदयाच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. दररोज चालण्यामुळे स्नायू आणि सांधे मजबूत होतात. दररोज चालण्याने सक्रिय राहण्यास मदत होऊन ताणतणाव कमी होण्यासही मदत होते. दररोज आठ ते दहा हजार पाऊले पायी चालल्याने वजन कमी करण्यास मदत होऊ शकते. आता वजन कमी करण्यासाठी कधीचालावे, याबाबत सविस्तर वाचा.


वजन कमी करण्यासाठी कधी चालणं फायदेशीर?


ओबेसिटी जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, वजन कमी करण्यासाठी चालणे हा सर्वात सोपा आणि प्रभावी व्यायाम आहे. जर वजन वाढले असेल आणि तुम्हाला कॅलरी बर्न करण्यासाठी चालणे हा बेस्ट पर्याय आहे. वजन कमी करायचे असेल तर सकाळी 7 ते 9 ही वेळ चालण्यासाठी असल्याचं संशोधनात समोर आलं आहे. जर तुम्हाला सकाळी चालण्यास वेळ मिळत नसेल तर संध्याकाळी आणि रात्री चालण्यानेही तुम्ही वजन कमी करू शकता.


रोज चालल्यानंतरही वजन का कमी होत नाही?


वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी चालण्यासोबतच योग्य आहारही गरजेचा आहे. वजन कमी करण्यासाठी कॅलरीजचे सेवन कमी करावं. जर दररोज 8 ते 10 हजार पावले चालूनही वजनात फरक पडत नसेल तर याचा अर्थ तुमच्या शरीरात खूप कॅलरीज आहेत. अशा परिस्थितीत फक्त व्यायाम किंवा चालण्याने फायदा होणार नाही, यासाठी तुम्हाला काही गोष्टींवर नियंत्रण ठेवावे लागेल. या गोष्टी कोणत्या पाहा.


वजन कमी करण्यासाठी चालण्याव्यतिरिक्त काय करावे?



  • साखर, गोड पदार्थ, चिप्स, कोल्ड्रिंक्स, जंक फूड यापासून दूर राहा.

  • दररोज 200 ते 300 पेक्षा कमी कॅलरीज बर्न करा.

  • तुमच्या आहारात पोषक तत्वांनी युक्त अन्नपदार्थांचा समावेश करा.

  • तुमच्या आहारात प्रथिने, कर्बोदके आणि पोषक घटकांचा समावेश करा.

  • वजन कमी करण्यासाठी पुरेशी झोपही आवश्यक आहे. यासाठी दररोज 7 ते 8 तासांची झोप घ्या.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Health Tips : तमालपत्र पाण्यात टाकून उकळा आणि सकाळी हे पाणी प्या, आरोग्यासाठी लाभदायक, जाणून घ्या फायदे