JN.1 Covid variant : कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा धोका वाढतोय. गेल्या काही दिवसांत JN.1 या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे (Covid variant) रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. चीनमध्ये JN.1 या व्हेरियंटचे रुग्ण चीनमध्ये वाढताना दिसत आहेत. चीनच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी कोविड 19 च्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने या व्हेरियंटचे रुग्ण झपाट्याने वाढतील, असा इशारा दिलाय. भारतातही JN.1 Covid variant चे रुग्ण वाढताना दिसत आहेत. चीनच्या इशाऱ्यामुळे जानेवारी महिन्याच्या शेवटपर्यंत भारताला सतर्क राहावे लागणार आहे. 


चीनच्या राष्ट्रीय आरोग्य समितीने (National Health Committee) म्हटले की, सध्या तरी JN.1 या नव्या व्हेरियंटचे रुग्ण कमी आहेत. मात्र, चीनच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी एक इशारा दिलाय. देशात JN.1 हा नवा व्हेरियंटचा व्हायरल मोठा प्रमाणात आहे, असे त्यांनी म्हटलय. भारत आणि जगातील इतर काही देशांमध्ये नव्या व्हेरियंटमुळे श्वास घेताना त्रास होतोय आणि इन्फ्लूएंजा सारखे लक्षण जाणवत आहेत. 


भारतात सध्या कोरोनाची परिस्थिती काय? 


भारतात गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 375 रुग्णांची नोंद झाली आहे. देशात सध्या कोरोनाचे 3,075 रुग्ण आहेत. गेल्या 24 तासांत कोविड 19 मुळे दोघांचा मृत्यू झालाय. भारतात सध्या कोरोना कमी होताना दिसत आहे. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात कोरोनाचे रुग्ण कमी झाले आहेत. 5 डिसेंबर 2023 पासून देशात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे (JN.1)रुग्ण वाढले आहेत. 6 जानेवारीपर्यंत देशातील 12 राज्यांत (JN.1)चे 682 रुग्ण आढळले आहेत. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांबाबत बोलताना सरकारने म्हटले होते की, 'घाबरुन जाण्याची गरज नाही. मात्र, आपल्याला सावध राहायचे आहे'.


चीनला कशाची भीती आहे?


चीनमधील आरोग्य विभाग सध्या सतर्क झाला आहे. थंडीच्या दिवसांत श्वास घेण्यासाठी लोकांना समस्या निर्माण होईल, अशी शक्यता चीनकडून व्यक्त करण्यात येत आहे. शिवाय श्वासासंबंधित इतर आजारही वाढू शकतात. चीनमधील रुग्णालयांना नव्या व्हेरिंयटबाबत सतर्क करण्यात आले आहे. चीनने कोरोनाचा सामना करण्यासाठी यंत्रणा तयार करण्यास सुरुवात केली आहे. 


देशात तापमान कमी झाल्यानंतर कोरोनाचे रुग्ण वाढत होते. JN.1 ऑमिक्रॉनचा सब व्हेरियंटच आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या JN.1 या नव्या व्हेरियंटला (variant of concern)असे म्हटले आहे. नव्या व्हेरियंटमुळे मृत्यू झालेल्या लोकांची संख्या फार कमी आहे. या व्हरियंटमुळे 1.18 टक्के लोकांचा मृत्यू झालाय. दरम्यान, भारत आणि अमेरिकेच्या आरोग्य विभागाने  ऑमिक्रॉनचा सब व्हेरियंट JN.1 बाबत माहिती दिली आहे. जगभरात JN.1 चे सर्वात जास्त रुग्ण आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Smoking : धूम्रपानामुळे मेंदूचा आकार कमी होतो, स्मरणशक्तीवरही परिणाम; वेळीच वाईट सवय सोडा