Foods to boost Immunity: हिवाळ्यात (Winter) सर्दी, खोकला, ताप या समस्या अनेकांना जाणवतात. हिवाळ्यात लहान मुले, वृद्ध आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्यांनी अधिक सावध राहावे. हिवाळ्यात इम्युनिटी वाढवण्यासाठी तुम्हाला काही पदार्थांचा समावेश आहारात करावा लागेल तसेच तुम्हाला या सोप्या टिप्स तुम्हाला फॉलो कराव्या लागतील.
या पदार्थांचा करा आहारात समावेश
बाजरी आणि नाचणीची भाकरी: तुम्ही आहारात बाजरी, नाचणी यांपासून तयार करण्यात आलेल्या भाकरीचा समावेश करु शकता. बाजरी आणि नाचणीमध्ये आरोग्यासाठी आवश्यक असणारी जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात आहेत.
भाज्या: हिवाळ्यात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश तुम्ही आहारात करु शकता. तसेच गाजर, रताळे यांचा देखील समावेश तुम्ही आहारात करु शकता.
डिंकाचे लाडू: डिंकाचे लाडू हे पौष्टिक असतात. हे लाडू हिवाळ्यात खाल्यानं इम्युनिटी सिस्टिम स्ट्राँग होते.
हिवाळ्यात चहामध्ये तुम्ही तुळस, वेलची, लवंग किंवा दालचिनी इत्यादी घालू शकता. यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते.
भारपूर पाणी प्या: हिवाळ्यात शरीराला सतत हायड्रेट ठेवा. जास्त पाणी प्यायल्यानं वात, पित्त होणे किंवा कफ होणे या समस्या जाणवत नाहीत. तसेच सकाळी तुम्ही एक ग्लास गरम पाणी पिऊ शकता.
तूप (Ghee) - हिवाळ्यात तूप खाणे खूप फायदेशीर आहे. तुपात आढळणारे हेल्दी फॅट हिवाळ्यात तुमचे शरीर उबदार ठेवतात, ज्यामुळे थंडीपासून आराम मिळतो. याशिवाय हिवाळ्यात तूप खाल्ल्याने त्वचेला ओलावा येतो.
कांदा (Onion) - हिवाळ्यात कांदा आपल्या शरीराला ऊब देतो. कांद्यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. म्हणूनच हिवाळ्यात कच्च्या कांद्याचे पराठे आणि कांदा कचोरी खाऊ शकता.
हिवाळ्यात सर्दी किंवा कफ झाला तर सर्वप्रथम वाफ घ्या. वाफ घेतल्याने गरम हवा नाकात आणि तोंडात जाते. त्यामुळे सर्दी किंवा कफ कमी होतो. वाफ घेण्यासाठी एका पातेल्यामध्ये गरम पाणी घ्या. त्यामध्ये निलगिरी तेलाचे दोन थेंब टाका. दिवसातून दोन वेळा या पाण्याची घेतल्यानंतर तुमची सर्दी कमी होईल. हिवाळ्यात पचन क्रिया मंदावते त्यामुळे हिवाळ्यात व्यायाम करणं देखील महत्वाचं आहे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Ghee In Winter: हिवाळ्यात साजूक तूप खाणं आरोग्यासाठी गुणकारी; वाचा तुपाचे आश्चर्यकारक फायदे