Ghee In Winter: तूप खाल्यानं वजन वाढतं, असं अनेकांचं मतं असतं. पण हिवाळ्यात (Winter) एक चमचा तूप खाणे शरीरासाठी फायदेशीर आहे. तूप आपल्या त्वचेसाठी फायदेशीर आहे. तुपातमध्ये फॅटी अॅसिड हे मुबलक प्रमाणात आढळतात, कोरड्या त्वचा मुलायम करु शकते. जाणून घेऊयात तूप खाण्याचे इतर फायदे-


त्वचेची समस्या
हिवाळ्यामध्ये त्वचेला खाज सुटणे, त्वचा कोरडी पडणे किंवा त्वचेवर पुरळ येणे इत्यादी समस्या जाणवत असतील तर सकाळी तुप खा. दूधात तूप मिक्स करून ते दूध तुम्ही पिऊ शकता.


हिवाळ्यात तुपाच्या खाल्यानं अपचनाची समस्या दूर होते. तुपामध्ये फॅट व्यतिरिक्त त्यात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन डी सारखे पोषक घटक आढळतात. तुपात आढळणारे ओमेगा 3 फॅटी ऍसिड आपल्या मेंदू आणि हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.


हिवाळ्यात काही लोकांना सतत कफची समस्या जाणवते. कफाची समस्या दूर करण्यासाठीही तूप गुणकारी आहे. तुपामध्ये अँटीइंफ्लेमेटरी आणि अँटीबॅक्टीरियल गुण असतात ज्यामुळे कफ कमी होतो. कफ दूर करण्यासाठी एक चमचा तूप गरम करून त्याचे सेवन करा. तुम्ही गरम तुपामध्ये आल्याची पावडर देखील टाकू शकता.


तुपाच्या सेवन केल्यानं दृष्टी तीक्ष होते. आयुर्वेदातही हिवाळ्यात तुपाचे सेवन डोळ्यांसाठी फायदेशीर असल्याचे सांगितले आहे.  तुपात भरपूर कॅल्शियम आणि व्हिटॅमिन ई असते ज्यामुळे आपली हाडे मजबूत होतात. त्यामुळे तुम्ही एक चमचा सकाळी आणि एक चमचा तूप खाऊ शकता. तुपामध्ये अनेक प्रकारचे विटॅमिन असतात.  अनोशीपोटी तूप खाल्ल्यानं केस घनदाट होतात. तसेच केस गळती देखील कमी होते. 


हिवाळ्यामध्ये काही लोकांना गुडघेदुखीचा त्रास होतो.  तूप टाकलेले गरम दूध प्यायल्याने तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास होणार नाही. या दूधाने सांध्यांमधील इन्फ्लामेशन कमी होते. तसेच हडे देखील मजबूत होतात. तूप मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी फायदेशीर आहे. हे पचायला खूप हलके आहे.  


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Knee Pain Remedies: हिवाळ्यात जाणवते गुडघेदुखीची समस्या? फॉलो करा या सोप्या टिप्स