Diabetic Child Care Tips : जर कुणी आपल्याला एखादी गोष्ट न करण्याचा सल्ला दिला तर, आपण ते आधी करुन पाहतो आणि सल्ल्याकडे दुर्लक्ष करतो. आपल्याला कुणी आरोग्याबाबतचा (Health Tips) सल्ला देत कोणता पदार्थ न खाण्याचा सल्ला दिला तर, आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. त्याचप्रमाणे काही खाण्याचा किंवा न खाण्याचा सल्ला देतो तेव्हा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. त्याचप्रमाणे जेव्हा आपण मुलांना काही खाण्यापासून थांबवतो, तेव्हा मुलही हे सहज मान्य करत नाहीत. त्यातच जर तुमच्या मुलाला मधुमेह (Diabetes) असेल, तर त्याच्या आहाराकडे तुम्हाला विशेष लक्ष द्यावं लागतं. 


सकस आहार हा साखरेवर नियंत्रण ठेवण्याचा सोपा मार्ग आहे. मधुमेह असलेल्या लहान मुलांना योग्य आहार देणं थोडं कठीण आहे, परंतु अशक्य नाही. काही सोप्या मार्गांबद्दल जाणून घ्या ज्याद्वारे तुम्ही मधुमेह असलेल्या मुलांनाही चविष्ट आहार देता येईल. 


मधुमेहाची लक्षणे काय?


जर तुमचे मूल वारंवार लघवी करत असेल. जर मुलाला खूप तहान लागली असेल आणि खूप लवकर थकवा जाणवू लागला असेल. यासोबतच त्याचे वजनही कमी होत आहे. ही मधुमेहाची सुरुवातीची लक्षणे असू शकतात. त्यामुळे अशा परिस्थितीत तुमच्या मुलाची वैद्यकीय तपासणी करण्याची गरज आहे. आरोग्यतज्ज्ञांच्या मते की, रक्तातील साखरेची चाचणी 200 मिलिग्रॅम प्रति डेसीलीटरपेक्षा जास्त असल्याचं दिसून आलं तर ते निश्चितपणे मधुमेहाचं लक्षण आहे.


लहान मुलांमध्ये मधुमेहाचे कोणते प्रकार आढळतात?


आरोग्यतज्ज्ञांच्या मते, सहा महिने ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना टाइप 1 मधुमेहाची समस्या होऊ शकते. दरम्यान, लहान मुलांमध्ये टाइप 1 मधुमेहाचा प्रकार अधिक प्रमाणात आढळतो. तसेच, मुलांमध्ये वाढत्या लठ्ठपणाच्या समस्येमुळे टाईप 2 मधुमेहाच्या प्रकरणांमध्येही वाढ झाल्याचं दिसून येत आहे.


मधुमेही मुलांपासून कोणते पदार्थ दूर ठेवावेत


मधुमेहाचा त्रास असलेल्या मुलांना गोड पेयांपासून दूर ठेवावं. ज्यूस, लस्सी आणि कार्बोनेटेड पेयं टाळा. तसेच, कुकीज आणि नट्ससह तळलेलं अन्नपदार्थ दूर ठेवा. यामुळे शरीरात ट्रान्सफॅटचं प्रमाण वाढतं. या खाद्यपदार्थांमुळे हृदयरोग आणि कर्करोगाचा धोका वाढतो. 


मधुमेही मुलांसाठी चविष्ट आहाराच्या टिप्स



  • डॉक्टरांच्या मते, तुमच्या मुलाला मधुमेह असेल तर, बाहेरचे अन्नपदार्थ देण्यापेक्षा तुम्ही घरी तयार केलेले अन्न देण्यास प्राधान्य द्या.

  • बाहेरचे अन्नपदार्थ शक्यतो टाळा. फास्टफूडमध्ये जास्त प्रमाणात साखर असते. यामुळे वजन वाढण्यासोबतच रक्तातील साखरेचे प्रमाणही वाढते. त्यामुळे घरात बनवलेल्या पारंपरिक खाद्यपदार्थांना अधिक प्राधान्य दिलं पाहिजे. 

  • मधुमेही मुलांसाठी स्टार्चविरहित भाज्या, प्रथिने आणि कर्बोदके हे घटक आवश्यक असतात. ते म्हणतात की मुलाला पौष्टिक आणि सकस आहार देण्याचा हा सर्वात सोपा आणि उत्तम मार्ग आहे.


मधुमेह असलेल्या मुलांचा नाश्ता कसा असावा?


मधुमेही मुलांना नाश्त्यामध्ये कार्बोहायड्रेट आणि प्रथिनयुक्त भाज्या आणि कॉटेज चीजसह बनवलेला बेसन चिला रोल यांचा समावेश करू शकता. बीन्स आणि गाजरांसह इतर भाज्या मिसळूनही पोहे बनवल्यास तोही एक चांगला पर्याय ठरेल.


जेवणात कसं असावं?


दुपारच्या जेवणासाठी तुम्ही एक वाटी सॅलड, एक वाटी रायता किंवा कोणतीही आवडीची भाजी देऊ शकता. सोबत एक वाटी डाळ आणि भातही मुलांना जेवणासाठी देता येईल.


मधुमेही मुलांना रात्रीच्या जेवणासाठी काय द्यावं?


रात्रीच्या जेवणात मुलांना पालक किंवा डाळ चपातीसोबत देता येईल. याशिवाय कोशिंबीर किंवा रायताही देता येईल. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Alert : धोक्याची घंटा! तुमच्याकडून दररोज होतंय प्लास्टिकचं सेवन, नकळतपणे गिळताय अनेक बारीक कण, आरोग्याला गंभीर धोका