Eye Care Tips : वयाच्या चाळीशीनंतर आपल्याला आरोग्याच्या अनेक तक्रारी जाणवू लागतात. आपले डोळे (Eyes) हा आपल्या शरीरातील पाच ज्ञानेद्रियांपैकी सर्वात महत्त्वाचा भाग. मात्र, वयाच्या चाळीशीनंतर आपल्या डोळ्यांची देखील दृष्टी हळूहळू कमी होऊ लागते. यासाठी वेळीच डोळ्यांची काळजी घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही तुमचा आहार आणि जीवनशैली (Lifestyle) चांगली ठेवली तर तुमचे डोळे निरोगी राहतील. अशा वेळी, डॉक्टर अनेकदा सल्ला देतात की, वयाच्या चाळीशीनंतर, नियमितपणे डोळ्यांची तपासणी करत राहा. कारण वाढत्या वयानुसार, एखादा आजार अनेकदा एखाद्या व्यक्तीला त्याचा बळी ठरवतो, तो म्हणजे ग्लूकोमा. मोतीबिंदू रोग वेळेत आढळल्यास, आपण तो टाळू शकतो. ग्लूकोमा वाढल्याने डोळ्यांवर दाब वाढतो आणि डोळ्यांच्या ऑप्टिक नर्व्हला इजा होऊ लागते. ज्यामुळे व्यक्तीला अंधत्वही येऊ शकते. ग्लूकोमामुळे दृष्टी गेली की ती परत मिळवता येत नाही. यासाठी डोळ्यांची काळजी घेणं गरजेचं आहे. या ठिकाणी आपण ग्लूकोमा वाढण्याची कारमं नेमकी कोणती? तसेच, ग्लूकोमाचे प्रकार कोणते? या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत.
ग्लूकोमा वाढण्याची कारणे
ग्लूकोमा वाढल्यामुळे, तीव्र डोकेदुखी, डोळे लाल होणे, खाज सुटणे, अंधुक दृष्टी ही काचबिंदूची लक्षणे असू शकतात. विशेषतः बीपी आणि मधुमेहाच्या रुग्णांना हा आजार लवकर होतो.
ग्लूकोमाचे प्रकार कोणते?
ओपन एंगल ग्लूकोमा
ओपन एंगल ग्लूकोमामध्ये डोळ्यांतून सतत पाणी येत राहते. त्यामुळे डोळ्यांवर परिणाम होतो. आणि पाहण्याची शक्ती धूसर होऊ लागते. या प्रकारच्या ग्लूकोमामध्ये ट्रॅबेक्युलर नर्व्हची समस्या असते. हे अनुवांशिक कारण असू शकते. हा रोग गर्भधारणेदरम्यान देखील होऊ शकतो.
एंगल क्लोजर ग्लूकोमा
या प्रकारच्या ग्लूकोमामध्ये डोळे लाल होतात तसेच डोळ्यांना वेदना होतात. यामध्ये डोळ्यांतून पाणी येऊ लागते.
ग्लूकोमा नेमक्या कोणत्या कारणांमुळे होतो?
बीपी आणि मधुमेहाच्या रुग्णांना वाढत्या वयाबरोबर हा आजार होऊ शकतो. डोळे आणि कपाळात तीव्र वेदना, डोळे लाल होणे, मळमळ, उलट्या, मळमळ इत्यादी त्याची सुरुवातीची लक्षणे आहेत. या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांची दृष्टी अंधुक होऊ लागते. यासाठी डॉक्ट वेळोवेळी डोळ्यांची तपासणी करायला सांगत असतात.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.