Fitness Tips : योगा (Yoga) करणे स्त्री आणि पुरुष दोघांसाठीही फायदेशीर आहे. योगासने आणि प्राणायामचा नियमित सराव केला तर अनेक शारीरिक व्याधी टाळता येतातच, शिवाय मानसिक स्वास्थ्यही चांगलं राहतं. प्रत्येक योगासनाचे वेगवेगळे फायदे आहेत. यापैकी एक योगासन, बटरफ्लाय योगासन. हे आसन महिलांसाठी तर महत्त्वाचे आहेच पण पुरुषांना या आसनाचे अनेक फायदे मिळतात. या आसनाचा तुम्ही तुमच्या जीवनशैलीत समावेश केल्यास तुमच्या निम्म्या समस्या दूर होतील. हे आसन नेमकं कोणतं आहे हे जाणून घेऊयात. 


पुरुषांच्या आरोग्य विषयक समस्येवर मात करण्यासाठी फुलपाखरू (तितली आसन) (Butterfly Posture) हे अत्यंत फायद्याचं आसन आहे. हे आसन केल्याने पुरुषांना आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांपासून आराम मिळतो. त्यामुळे त्याचा नियमित सराव केला पाहिजे.


तितली आसन (Butterfly Posture) :


तितली आसन करण्यासाठी तुम्हाला जमिनीवर चटई टाकून बसावे लागेल. यानंतर, तुम्हाला तुमचे गुडघे वाकवून पाय श्रोणीच्या जवळ आणावे लागतील. आता तुम्हाला तुमच्या दोन्ही पायांचे तळवे एकत्र ठेवावे लागतील. आता दोन्ही पाय हातांनी घट्ट पकडून ठेवा. शेवटी फुलपाखराच्या पंखाप्रमाणे मांड्या वर करून खाली करा. या स्थितीत काही मिनिटे ही प्रक्रिया पुन्हा करत रहा. 


पुरुषांसाठी तितली आसनाचे फायदे (Butterfly Posture Benefits) :


स्टॅमिना वाढतो


तितली आसन केल्याने पुरुषांना उत्साही वाटते. जर तुम्हाला थकवा आणि अशक्तपणाची समस्या असेल तर तितली आसन नियमित करा. हे आसन पुरुषांचा स्टॅमिना वाढवण्यासाठी फार उपयुक्त आहे.


वेदनेपासून आराम मिळतो  


दिवसभर एकाच जागी बसून काम केल्यामुळे तुम्हाला मांडीचे दुखणे किंवा पाठदुखीचा त्रास होत असेल, तर तितली आसन करणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे आसन केल्याने स्नायू शिथिल होतील आणि दुखण्यापासून आराम मिळतो.


तसेच तितली आसन केल्याने तुमचे अंतर्गत स्नायू बळकट होतात आणि मांड्यांभोवतीच्या स्नायूंच्या वेदना कमी होतात. एवढेच नाही तर, या आसनाच्या मदतीने गुडघेदुखीमध्येही आराम मिळतो. तितली आसन केल्याने शरीरातील थकवा आणि अशक्तपणा दूर होतो. इतकंच नाही तर, रोगप्रतिकारशक्तीही वाढण्यास मदत होते. त्यामुळे जेव्हाही थकवा जाणवेल तेव्हा तितली आसन करा. 


महत्त्वाच्या बातम्या :


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


Pregnancy Health Issues : गरोदरपणात महिलांना 'या' आजारांचा सर्वाधिक धोका; अशी आरोग्याची काळजी घ्या