Eyes Remedies : संगणकावर तासनतास काम करुन डोळ्यांवर ताण येतो. यामुळे डोळ्यांना थकवा जाणवतो. त्याशिवाय अपुरी झोप यामुळेही डोळ्यांना थकवा येतो किंवा डोळे दुखतात. अशा वेळी डोळ्यांचा थकवा घालवण्यासाठी काय उपाय करावेत, हे अनकांना माहितस नसते. पण आम्ही तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देणार आहोत. आम्ही तुम्हाला डोळ्यांचा थकवा दूर करण्यासाठी काही टीप्स सांगणार आहोत. याचा वापर केल्याने डोळ्यांचा थकवा दूर होऊन तुम्हाला प्रसन्न वाटेल. जाणून घ्या काय आहेत हे उपाय...


काकडीही उपयोगी


डोळ्यांचा थकवा आणि जळजळ दूर करण्यासाठी तुम्ही काकडीचा वापर करु शकता. यासाठी काकडीच्या स्लाईस कापा. या स्लाईस डोळ्यावर ठेवा. यामुळे तुम्हाल अगदी काही मिनिटांमध्ये आराम मिळेल.


बटाट्याचा असा करा वापर


डोळ्याचा थकवा दूर करण्यासाठी बटाटा फार उपयुक्त आहे. डोळ्यांची जळजळ आणि थकवा दूर करण्यासाठी तुम्ही बटाट्याचा वापर करु शकता. यासाठी एक बटाटा घेऊन त्यांच्या पातळ स्लाईस कापा. या स्लाईस डोळ्यांवर काही मिनिटे ठेवा. यामुळे डोळ्याचा थकवा दूर होईल.


दूधाचा वापर करा


डोळ्यांचा थकवा दूर करण्यासाठी थंड दूधाचा वापर करा. यामुळे डोळ्यांचा थकवा दूर होईल. यासाठी थंड दूध आणि कापसाचा बोळा घ्या. आता थंड दुधात कापसाचा बोळा बनवून त्याचा पॅच बनवून डोळ्यांवर ठेवा. यामुळे डोळ्यांचा थकवा आणि जळजळकमी होईल.


कोरफड वापरून पाहा


डोळ्यांचा थकवा दूर करण्यासाठी कोरफड किंवा कोरफडीचं जेल प्रभावी ठरेल. यासाठी कापसाचा बोळा कोरफडीच्या रसात किंवा कोरफड जेलमध्ये बुडवून काही वेळ डोळ्यांवर राहू द्या. यामुळे थकवा दूर होईल.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. 


महत्वाच्या बातम्या :