Drinking Water In Summer : सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे आपल्या शरीराला पाण्याची जास्त आवश्यकता असते. साधारण शरीराला दिवसभरात 4 ते 5 लिटर पाणी पुरेसं असतं. पण जर पाणी पिण्यात खंड पडला तर तुमच्या शरीरावर याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया...
किडनीच्या समस्येला निमंत्रण ( Kidney problems)
तुम्ही जर शरीराच्या गरजेपेक्षा कमी पाणी पित असाल तर याचा तुमच्या किडनीवर परिणाम होतो. पाण्यामुळे शरीरातून नको असलेले घटक बाहेर टाकले जातात. कमी पाणी पिण्यामुळे किडनीचे फंक्शनिंग बिघडते. परिणामी अनेक समस्यांना समोरे जावं लागू शकतं.
बद्धकोष्ठतेची समस्या (constipation problem)
तुम्ही आळस करून कमी पाणी पित असाल तर तुम्हाला बद्धकोष्ठतेच्या (constipation) समस्येला सामोरे जावं लागू शकतं. कारण कमी पाणी पिण्यामुळे पचनसंस्थेवर वाईट परिणाम होतं असतं. त्यामुळे दिवसभरात योग्य प्रमाणात पाणी प्यायले तर पचनसंस्थेचे कार्य सुरळीत सुरू राहते.
मूत्रमार्गातला संसर्ग (urinary tract infections)
सतत कमी पाणी पिण्यामुळे मूत्रमार्गात संसर्ग होण्याची शक्यता आहे. पाणी जास्त प्यायल्यामुळे शरीरातील नको असलेले घटक बाहेर टाकले जातात. कमी पाणी प्यायल्याने नको असलेले घटक शरीरात जमा होऊन युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन म्हणजे मूत्रमार्गातल्या संसर्गाचा धोका वाढू शकतो. थोडक्यात मूत्रमार्गाच्या जागी जळजळ सुरू होते. हा पुरूषांपेक्षा महिलांमध्ये आढळणारा आजार आहे.
त्वचेची समस्या (skin problem)
तुम्हा जर कमी पाणी पित असाल तर तुमच्या त्वचेवर त्याचा परिणाम दिसून येतो. त्वचा निस्तेज, कोरडी, निर्जीव दिसायला लागते. तुमच्या चेहेऱ्यावरील चमक हरवलेल्याचं दिसून येतं. जर वेळेत पाणी प्यायले तर त्वचा तजेलदार आणि टवटवीत दिसायला लागते. तुमची त्वचा डल दिसत नाही.
मेंदूच्या कार्यामध्ये समस्या (brain functioning problem)
जी लोक कमी प्रमाणात पाणी पितात त्यांच्यात एनर्जीलेवल कमी असल्याचं दिसून आलं. तसेच त्यांचा मेंदूही नीट काम करत नसल्याचं तत्ज्ञांचं म्हणणे आहे. यामुळे कामावर फोकस राहत नाही आणि मुडही खराब होतो. सारखं डोक जड, डोकेदुखी या सारख्या समस्यांना सामोरे जावे लागतं. त्यामुळे पाणी वेळेत प्या. अन्यथा मेंदूच्या फंक्शनिंगमध्ये समस्या निर्माण होऊ शकतात.
Disclaimer: या लेखातील माहिती ही केवळ सर्वसामान्यांच्या जागरूकतेसाठी प्रकाशित केलेली आहे. यापैकी कोणताही मजकूर हा वैद्यकीय सल्ला नाही. आपल्या शंका किंवा प्रश्नांसाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.