Home Remedies: बदलती जीवनशैली, तळळेले किंवा मसालेदार पदार्थ, खाण्यापिण्याच्या चुकीच्या वेळा यामुळे अनेकदा अ‍ॅसिडिटी (Acidity) किंवा आम्लपित्ताची समस्या त्रास द्यायला लागते. छातीत आणि पोटात जळजळ अशा समस्या दररोज त्रास देतात. ही परिस्थिती टाळण्यासाठी आणि त्वरित आराम मिळवण्यासाठी बरेच लोक औषधे घेतात. मात्र, डॉक्टरांना न सांगता अशी औषधे घेतल्याने आरोग्याला हानी पोहोचते.तसेच, रसायनयुक्त औषधे देखील बहुतेक प्रकरणांमध्ये काही दुष्परिणाम दाखवतात.


अशावेळी औषधांऐवजी आपण काही घरगुती उपाय करून पाहू शकतो. आम्ही तुम्हाला अशाच सोप्या घरगुती उपायांबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला अ‍ॅसिडिटीपासून त्वरित आराम मिळेल.



  1. दोन वेगवेगळ्याप्रकारे खा बडीशेप


अ‍ॅसिडिटीपासून झटपट आराम मिळवण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे एक चमचा बडीशेप खाणे आणि नंतर दोन-तीन घोट कोमट पाणी पिणे. याने तुम्हाला त्वरित आराम मिळू शकतो.


जर, अॅसिडिटीचा त्रास होत असेल आणि तुम्ही प्रवासाला जात असाल, तर सोबत बडीशेप आणि साखर एकत्र ठेवा. बडीशेप आणि साखर एकत्र खाल्ल्यास अॅअ‍ॅसिडिटीपासून त्वरित आराम मिळतो.



  1. गूळ खाण्यानेही मिळेल आराम


गुळात पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हे दोन्ही घटक आढळतात. ते शरीरातील पीएच संतुलन राखण्यास आणि पचन सुधारण्यास मदत करतात. गुळाचा एक छोटा तुकडा खाल्ल्याने अ‍ॅसिडिटी होण्याची समस्या पूर्णपणे बरी होईल. मात्र,  जास्त प्रमाणात गुळ खाल्ल्यास जळजळ वाढू शकते.



  1. ओवा


आपल्या देशातील प्रत्येक घराच्या स्वयंपाकघरात ओव्याचा वापर केलाच जातो. अ‍ॅसिडिटी झाली असेल, तर पाव चमचा ओवा चावून खा आणि वरून थोडे पाणी प्या. याने तुम्हाला त्वरित आराम मिळेल. जर, घरात ओव्याची पाने असतील, तर त्यात काळे मीठ टाकून खाऊ शकता. हे खाल्ल्यानंतरही थोडे पाणी प्यावे. छातीत जळजळ, पोटात जळजळ आणि मळमळ या समस्यांमध्ये या दोन्ही पद्धती खूप प्रभावी आहेत.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या :