How to prevent Diarrhea : लहान मुलांमध्ये सध्या अतिसार (Diarrhea) आणि उलट्या यांसारख्या आजाराचे प्रमाण वाढले आहे. वाढत्या उष्णतेमुळे पचनासंबंधित आजारांमध्ये वाढ झाली आहे. लहान मुलांमध्ये अतिसार झाला तर पुढील 15 दिवसांपर्यंत याचा परिणाम मुलांच्या खाण्यापिण्यात दिसून येतो. सध्याच्या समोसमात लहान मुलांच्या आरोग्याची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.
1. शरीर हायड्रेटेड ठेवा.
अनेक वेळा लहान मुलं केवळ खूप तहान लागल्यावरच पाणी पितात. यामुळे मुलांना वेळोवेळी पाणी पाजत राहा. मुलांच्या पाण्याची बॉटल साफ असेल. याची काळजी घ्या. मुलांना ग्लासातून पाणी पिण्यास देणे उत्तम राहील.
2. गरम किंवा ठंड पाणी देऊ नका, साधे पाणी पाजा.
गरमी किंवा उन्हात आरओ ठेऊ नका. उन्हान ठेवलेल्या आरओतील किंवा भांड्यातील पाणी पिऊ नका. लहान मुलांनाही उन्हात ठेवलेले किंवा फ्रिजमधील थंड पाणी पिण्यास देऊ नका.
3. ताजं अन्न द्या.
लहान मुलांना घरी बनवलेलं ताजं अन्न खायला द्या. मुलांना शिळं अन्न देऊ नका. याशिवाय लहान मुलांना दही देताना ते आंबट आहे का तपास. मुलांना आंबट दही देणं टाळा.
4. जास्त आईस्क्रीम देणं टाळा
शक्य असल्यास लहान मुलांना आईस्क्रीम देण्याचं प्रमाण कमी करा. अनेकवेळा दुकानात ठेवलेले आईस्क्रीम फ्रीझर न चालल्याने वितळते आणि नंतर परत गोठते. पण असे आईस्क्रीम खाल्ल्याने मुले आजारी पडू शकतात. आईस्क्रीम खायला द्यायचे असेल तर घरीच तयार केलेलं आईस्क्रीम खायला द्या
5. उष्माघातापासून बचाव
खाण्यापिण्याव्यतिरिक्त लहान मुलांना अधिक थंड किंवा अधिक वातावरणात ठेऊ नये. सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत त्यांना उन्हात जाऊ देऊ नका. उन्हात जायचे असेल तर टोपी आणि सनग्लासेस घालून पाठवा. पण शक्यतो लहान मुलांना तीव्र सूर्यप्रकाशात पाठवणं टाळा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत
महत्वाच्या बातम्या :
- Curd Eating Tips : आयुर्वेदिक पद्धतीने दही खाल्ल्याने अनेक आजारांपासून बचाव होईल
- Orange Juice : लठ्ठपणा टाळायचा असेल तर संत्र्याचा रस पिणं बंद करा, 'हे' आहे कारण
- Health Tips : अंगावर खाज येत असेल तर करा 'हे' घरगुती उपाय; लगेच मिळेल आराम
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
Calculate The Age Through Age Calculator
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
Calculate The Age Through Age Calculator
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )