Viral News : एका व्यक्तीने लघवी करताना होत असलेला त्रास दूर करण्यासाठी विचित्र उपाय केला. या विचित्र उपायामुळे त्याची समस्या दूर तर झालीच नाही. मात्र, हा  उपाय जीवावर बेतला असता. या व्यक्तीला त्रास होऊ लागल्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. उपचार करणाऱ्या डॉक्टरांना त्याने वस्तुस्थिती सांगितल्यावर डॉक्टरही हैराण झाले. लघवीला त्रास होत असलेल्या व्यक्तीने आपल्या लिंगात इलेक्ट्रीक केबल घुसवली होती. डॉक्टरांनी 18 सेमी लांबीची केबल काढली. 


पाकिस्तानमध्ये ही घटना घडली. ही घटना Urology Case Reports या वैद्यकीय जर्नलमध्ये प्रकाशित झाली आहे. जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानमधील 64 वर्षीय व्यक्तीला लघवीची समस्या होती. या त्रासापासून सुटका करण्यासाठी त्याने डॉक्टरांऐवजी ऐवजी स्वत: उपाय योजला. त्याने जवळपास 18 सेमी लांब इलेक्ट्रीक केबल वायर मलमूत्र मार्गात ढकलली. मात्र ही वायर मलमूत्र मार्गात अडकली.  या घटनेनंतर त्याला कराचीतील अब्बासी शहीद रुग्णालयात दाखल करण्यात आले. 


अशी काढली वायर


उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की, त्याच्या लिंगाला स्पर्श केल्यानंतरही त्यात अडकलेली वायर जाणवत होती. एक्स-रे काढल्यानंतर ही वायर मलमूत्र नळीपासून ब्लॅडरपर्यंत पोहचली असल्याचे दिसून आले. या आधी डॉक्टरांनी तारेचे निरीक्षण करण्यासाठी मलमूत्र मार्गात एक कॅमेरा टाकण्याचा विचार केला होता. मात्र, त्या व्यक्तीच्या लिंगाजवळ वायरचा एक भाग दिसून आला. त्यानंतर डॉक्टरांनी चिमट्याच्या मदतीने ही वायर खेचून काढली. 


डॉक्टरांनी सांगितले की, या वायरची लांबी 18 सेमी इतकी लांब होती. ही वायर काढल्यानंतर त्या व्यक्तीला रक्तस्त्राव अथवा जखम झाल्याची कोणतीही समस्या जाणवली नाही. 


आरोग्याला गंभीर धोका


मलमूत्र मार्गात कोणतीही वस्तू अडकल्यास मोठा त्रास होऊ शकतो. यामध्ये जळजळ होण्यासह लघवी करताना त्रास जाणवू शकतो. काही गंभीर प्रकरणात मूत्राशयात एक लहानसे छिद्र करून मलमूत्र बाहेर काढण्याचा पर्याय डॉक्टरांकडून अवलंबला जातो. काही वेळेस एखादी वस्तू अडकल्यास शस्त्रक्रियादेखील करावी लागते. काही प्रकरणात मलमूत्राच्या नळीला बदलण्यात येते.