Pumpkin Seed Benefits : कोरोनामधून बरे झाल्यानंतर अनेक मंडळींना डोकेदुखी, झोप न येणे , तणाव आणि नैराश्य यासारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. कोरोनाकाळात ही समस्या अधिकच वाढली आहे. तणावामुळे केस गळणे, डोळे कमकुवत होणे, मायग्रेन, हृदयविकार, रक्तदाब यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. तणाव कमी करण्यासाठी भोपळ्याच्या बियांचा आहारात समावेश करा. यामुळे अनेक फायदे होतात. भाज्या, फळे पोषक असल्याने आपण त्यांचा आहारात समावेश करतो. पण फळांच्या बिया दुर्लक्षित राहतात. काही बिया अत्यंत पौष्टीक असून त्याचे अनेक आश्चर्यकारक फायदे आहेत. त्यामुळे त्यांचाही आहारात समावेश करणे फायेदशीर ठरेल.
काही लोकांना भोपळ्याची चव आवडत नाही, पण भोपळ्याच्या बिया बऱ्याच जणांना आवडतात. विविध प्रकारचे गोड पदार्थ आणि नाश्ता बनवण्यासाठीही भोपळ्याच्या बियांचा वापर केला जातो.
तणावमुक्ती :
भोपळ्याच्या बिया खाल्ल्याने तणाव दूर होतो. भोपळ्याच्या बियांमध्ये व्हिटॅमिन सी असते. भोपळ्याच्या बियांमध्ये मॅग्नेशियम असते जे तुम्हाला शांत ठेवते. त्यात बी जीवनसत्त्वे आणि झिंक देखील असतात. ते तणाव दूर करण्यास मदत करतात.
झोप न येणे :
जर तुम्हाला झोपेचा त्रास होत असेल तर तुम्ही भोपळ्याच्या बिया खाऊ शकता. या बियांच्या सेवनाने शांत झोप लागते.
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यात मदत :
भोपळ्याच्या बियांमध्ये मॅग्नेशियम, झिंक आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे रोगप्रतिकारक वाढायला मदत होते.
भोपळ्याच्या बियांमध्ये अँटी फंगल म्हणजे संसर्ग रोखण्यास उपयुक्त असणारे गुणधर्म आहेत. प्रत्येक दिवशी दोन ते तीन चमचे भोपळ्याच्या बियांचे सेवन केल्यास शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
भोपळ्याच्या बियांचे फायदे-
-फंगल इनफेक्शन कमी करण्यास फायदा होतो.
-या बियांच्या सेवनाने जखम भरण्यास मदत होते.
-ऍलर्जी कमी होते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
[yt]