Covishield vs Covaxin: कोरोना व्हायरस (Coronavirus Updates) म्हटलं की, धडकी भरते. याच कोरोनानं (Covid-19) काही दिवसांपूर्वी अख्खं जग वेठीस धरलं होतं. जागतिक महामारीनं संपूर्ण जगाला विळखा दिला. कोरोना, लॉकडाऊननं सगळ्यांचंच जग पूरतं बदलून गेलं. जीवघेण्या कोरोनापासून बचाव करण्यासाठी जगभरातील असंख्य वैज्ञानिक अहोरात्र लस तयार करण्यासाठी झटत होते. अखेर आशेचा किरण सापडलाच. जगभरातील अनेक देशांच्या प्रयत्नांना यश आलं. भारतातही काही लसींना मंजुरी मिळाली. भारतीयांना कोरोना काळात देण्यात आलेल्या सर्वाधिक लसींपैकी प्रमुख लसी म्हणजे, 'कोविशील्ड' (Covishield) आणि 'कोवॅक्सीन' (Covaxin).
कोरोना काळात केंद्र सरकारकडून संपूर्ण देशभरात लसीकरण मोहीम राबवण्यात आली. 'कोविशील्ड' आणि 'कोवैक्सीन' या दोन लसी भारतीयांना देण्यात आल्या. संपूर्ण लसीकरण मोहीमेदरम्यान एक प्रश्न सातत्यानं चर्चेत होता, तसेच, हाच प्रश्न प्रत्येक भारतीयाच्या मनात होता, तो म्हणजे, सर्वात फायदेशीर लस कोणती? 'कोविशील्ड' की 'कोवॅक्सीन'? अनेकांनी मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला, तर काहींनी थेट डॉक्टरांचाच सल्ला घेतला. तसेच, अनेकांनी जी मिळतेय ती लस घेऊन थेट विषयच संपवला. पण तरिही नेमकी सर्वात फायदेशीर लस कोणती? या प्रश्नाचं उत्तर मात्र अनुत्तरीतच होतं. अशातच आता एका संशोधनातून या प्रश्नाच्या उत्तराचा उलगडा झाला आहे.
लाईव्ह मिंटनं दिलेल्या वृत्तानुसार, 'लॅसंट रिजनल हेल्थ साऊथ ईस्ट आशिया'च्या जर्नलमध्ये 6 मार्च रोजी पब्लिश करण्यात आलेल्या संशोधनातून या प्रश्नाचं उत्तर समोर आलं आहे. "Immunogenicity of SARS-CoV-2 vaccines BBV152 (COVAXIN) and ChAdOx1 nCoV-19 (COVISHIELD) in seronegative and seropositive individuals in India: a multicentre, non-randomized observational study" असं कोरोना लसींबाबत करण्यात आलेल्या संशोधनाचं नाव आहे. हे संशोधन 11 ग्रुप ऑफ इस्टीट्यूट्सवर करण्यात आलं आहे. यामध्ये नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल रिसर्च (NCBS) च्या संशोधकांचाही समावेश होता.
कोविशील्ड की कोवॅक्सिन कोणी मारली बाजी?
या सर्वसमावेशक संशोधनात 'कोविशील्ड'नं 'कोव्हॅक्सिन'चा पराभव केल्याचं निष्कर्षातून समोर आलं आहे. या संशोधनामुळे दोन्ही लसींचा तुलनात्मक डेटाच समोर आलेला नाही, तर भविष्यात अशा संशोधनासाठी एक नवा मार्गही दाखवला आहे. हे संशोधन जून 2021 ते जानेवारी 2022 दरम्यान करण्यात आला होता, ज्यामध्ये 691 सहभागींचा समावेश करण्यात आला होता. संशोधनात सहभागी झालेल्या व्यक्तींचं वय 18 ते 45 वर्षांच्या दरम्यान होतं, तसेच, संशोधनातील सर्व सहभागी व्यक्ती पुणे आणि बंगळुरू येथील होत्या. यामध्ये, लसीकरणापूर्वी आणि नंतर लोकांच्या रोगप्रतिकारक प्रतिक्रियांचे परीक्षण केलं गेलं.
कोविशील्ड सर्वात फायदेशीर
1. कोरोनाव्हायरसचे स्पाइक प्रोटीन वितरीत करण्यासाठी व्हायरस वेक्टरचा फायदा घेऊन, कोविशील्डनं निष्क्रिय विषाणू लस कोवॅक्सिनपेक्षा मजबूत रोगप्रतिकारक प्रतिसाद सातत्यानं प्रदर्शित केला. उल्लेखनीय बाब म्हणजे, कोविशील्डनं संशोधनात सहभागी झालेल्या बहुतेक व्यक्तींनी संपूर्ण रोगप्रतिकारक प्रतिसाद दर्शविला, तर कोवॅक्सिनला परिवर्तनशील प्रतिसाद होता, विशेषत: ओमायक्रॉन प्रकाराच्या उदयापूर्वी लसीकरण केलेल्यांमध्ये प्रतिसाद चांगला दिसला.
2. कोविशील्डनं सेरोनेगेटिव्ह आणि सेरोपॉझिटिव्ह दोन्ही लोकांमध्ये हाय अँटीबडीची लेव्हल दर्शवली, जी अधिक शक्तिशाली आणि इम्यून रिस्पॉन्स दर्शवते.
3. Covishield ने Covaxin पेक्षा जास्त T पेशी निर्माण केल्या, ज्या मजबूत इम्यून रिस्पॉन्स दर्शवतात.
4. कोविशील्डनं कोवैक्सिनच्या तुलनेत अनेक व्हायरस स्ट्रेंसच्या विरोधात सलग अँटीबॉडीच्या सर्वोच्च स्तराचं प्रदर्शन केलं. जो ओमायक्रॉनसारख्या व्हेरियंटच्या विरोधात उत्तम सुरक्षा पुरवतं.
(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)
महत्त्वाच्या बातम्या :
Liver Damage : सावध व्हा, 'हे' व्हिटॅमिन वाढल्यामुळे लिव्हर डॅमेजचा धोका; कशी काळजी घ्या?