मुंबई : आपल्याकडे तोंडली (pointed gourd)एक लोकप्रिय भाजीचा प्रकार आहे. तसं तर कच्ची तोंडली देखील खाल्ली जातात. या तोंडल्याचे आपल्या शरीरासाठी अनेक फायदे आहेत. तोंडली वजन कमी करण्यासाठी अत्यंत उपयोगी आहे. सोबतच पोटाच्या तक्रारी आणि रक्तातील कोलेस्टेरॉल आणि शुगर लेव्हल नियंत्रित करण्यासाठी देखील लाभकारक आहे. माहितीनुसार 100 ग्रॅम तोंडलीमध्ये सुमारे 1.4 मिलीग्राम लोह, 0/08 मिलीग्राम व्हिटॅमिन बी -2 , 0.07 मिलीग्राम व्हिटॅमिन-बी 1, 1.6 ग्रॅम फायबर आणि 40 मिलीग्राम कॅल्शियम असते.  तोंडल्याचे आणखी अनेक फायदे आहेत. त्याविषयी आज आपण जाणून घेऊ.




तापावर नियंत्रण आणण्यास गुणकारी 


आयुर्वेदाच्या मते तोंडली आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढवते. ताप, घशाच्या समस्यांवरील इलाजावर औषधाचे काम देखील तोंडली करते. नियमित तोंडली खाल्ल्याने सर्दी आणि ताप वारंवार येण्यावर नियंत्रण आणले जाऊ शकते.


पचनशक्ती चांगली करण्यास उपयोगी 


या भाजीमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात मिळते. त्यामुळे पचनशक्ती सुधारायला तोंडली उपयोगी आहे. तसेच लिव्हरच्या समस्यांवर देखील हे गुणकारी आहे. यामुळे आपल्या नियमित आहारात  तोंडल्यांचा समावेश असणे आवश्यक आहे. 


अॅसिडिटीवर देखील तोंडली लाभदायी आहे. रोज तोंडली खाल्ल्याने अॅसिडिटीची समस्या होत नाही.


वजन कमी करण्यासाठी उपयोगी 


तोंडली वजन कमी करण्यासाठी अत्यंत महत्वाचे मानले जाते. तोंडली खाल्ल्याने भूकेवर नियंत्रण येण्यास मदत होते. तोंडल्यामध्ये कॅलरी कमी असतात. खूप वेळ पर्यंत यामुळे पोट भरलेलं राहतं. सोबतच हे अँटी ऑक्सिडंट आहे.


व्हिटॅमिन ए आणि सी यामध्ये भरपूर प्रमाणात असते. वय वाढण्यासाठी देखील हे उपयोगी मानले जाते. तर अशा बहुउपयोगी असलेल्या तोंडल्यांचा समावेश आपल्या आहारात असणं आवश्यक आहे. अनेक प्रकारच्या आजारावर आणि शरीर स्वस्थ ठेवण्यासाठी हे उपयोगी आहे.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या :