नवी दिल्ली : सध्या कोविशिल्ड (Covishield) कोरोना लसीवरून (Corona Vaccine) भीतीचं वातावरण असताना दुसरीकडे आता आणखी कोवॅक्सिन (Covaxin) कोरोना लस घेतलेल्यांची देखील चिंता वाढली आहे. कोवॅक्सिन घेतलेल्या 30 टक्क्यांहून अधिक लोकांना एका वर्षानंतर आरोग्य संबंधित समस्या आढळल्याचं एका अभ्यासात समोर आलं आहे. कोवॅक्सिन घेतलेल्या 30 टक्क्यांहून अधिक लोकांना एका वर्षानंतर आरोग्य संबंधित समस्या आढळल्याचं एका अभ्यासात समोर आलं आहे.


कोवॅक्सिन घेतलेल्यांनाही आरोग्यासंबंधित समस्या


कोवॅक्सिन कोरोना लस घेतलेल्या व्यक्तींमध्येदेखील आरोग्यासंबंधित समस्या आढळल्याचा दावा करण्यात आला आहे. बनारस हिंदू विद्यापीठाच्या (BHU) संशोधकांच्या पथकाने एक वर्षाच्या अभ्यासानंतर हा दावा केला आहे. ज्यांना भारत बायोटेकची अँटी-कोविड लस  कोवॅक्सिन घेतली, त्यापैकी सुमारे एक तृतीयांश लोकांमध्ये आरोग्याशी संबंधित समस्या आढळल्याचा दावा करण्यात आला आहे. या व्यक्तींना कोवॅक्सिन घेतल्यानंतर काही अडचणींना सामोरे जावं लागल्याचं सांगण्यात आलं आहे. 


50 टक्के लोकांना कोवॅक्सिन घेतल्यानंतर श्वसन संक्रमण


बनारस हिंदू विद्यापीठाच्या अभ्यासामध्ये 926 लोकांवर संशोधन आणि निरीक्षण करण्यात आले. स्प्रिंगर नेचर या जर्नलमध्ये हा अभ्यास प्रकाशिक करण्यात आला आहे. या संशोधनातील  926  व्यक्तींपैकी सुमारे 50 टक्के लोकांना कोवॅक्सिन घेतल्यानंतर श्वसन संक्रमण झाल्याची तक्रार होती. हा संसर्ग त्याच्या श्वसनसंस्थेच्या वरच्या भागात झाला होता. 


भारत बायोटेकटची लस घेतल्यावरही आरोग्यासंबंधित समस्या


अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की, कोवॅक्सिन घेतलेल्या एक टक्के लोकांनी AESI ची समस्या होती, ज्यामध्ये स्ट्रोक आणि गुइलेन-बॅर सिंड्रोमचा समावेश आहे. गुइलेन-बॅर या सिंड्रोममध्ये लोकांचे पाय सुन्न होऊ लागतात आणि हे लक्षण शरीराच्या इतर भागात पसरू लागतात. कोवॅक्सिन घेतलेल्या एक टक्के लोकांना ही समस्या जाणवली.


कोविशिल्डनंतर आता कोवॅक्सिन लसीमुळे चिंता वाढली


दरम्यान, ब्रिटीश फार्मास्युटिकल कंपनी एस्ट्राझेनेकाने कोविशिल्ड लसीमुळे रक्ताच्या गुठळ्या आणि प्लेटलेटची संख्या कमी होऊ शकते, हे काही ब्रिटनच्या कोर्टात काही दिवसांपूर्वी मान्य केलं होतं. काही प्रमाणात ही शक्यता असून अशी प्रकरणे मोजकीचं असल्याचंही कंपनीने सांगितलं होतं.


कोवॅक्सिन घेतल्यानंतर या समस्या जाणवल्या


संशोधकांनी जानेवारी 2022 ते ऑगस्ट 2023 या कालावधीत 926 लोकांवर केलेल्या अभ्यासात असं दिसून आलं आहे की, कोवॅक्सिन घेतल्यानंतर, सुमारे एक तृतीयांश व्यक्तींनी AESI ची तक्रार होती. ज्यामध्ये त्यांना त्वचा-संबंधित रोग, सामान्य आजार आणि मज्जासंस्थेशी संबंधित आजारांचा सामना करावा लागला. यामध्ये विशेषतः किशोरवयीनांना या समस्येचा सामना करावा लागला.


चार जणांच्या मृत्यूची नोंद


दरम्यान, संशोधनात 635 किशोर आणि 391 प्रौढांचा समावेश करण्यात आला होता. लसीकरण झाल्यानंतर एक वर्षानंतर या सर्व लोकांना तपासणीसाठी संपर्क करण्यात आला. अभ्यासानुसार, 10.5 टक्के किशोरवयीनांना त्वचेशी संबंधित आजार, 10.2 टक्के सामान्य आजार आणि 4.7 टक्के मज्जासंस्थेशी संबंधित आजारांनी ग्रासले होते. कोवॅक्सिन घेतल्यानंतर 4.6 टक्के महिलांमध्ये मासिक पाळीतील असामान्यता दिसून आल्याचाही या अभ्यासात दावा करण्यात आला आहे. तर तीन महिला आणि एका पुरुषाचा मृत्यू झाल्याचीही नोंद आहे. या चारही जणांना मधुमेह होता, तर तिघांना उच्च रक्तदाबही होता आणि त्यापैकी दोघांनी कोवॅक्सिन लस घेतली होती.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Covishield : तुम्हीही कोविशिल्ड लस घेतलीय? ह्रदयविकाराचा झटका किंवा ब्रेन स्ट्रोकचा कितपत धोका? जाणून घ्या सविस्तर...