Child Health : आजकाल बदलत्या काळानुसार शिक्षणाचे स्वरूपही बदलत चालले आहे. अशात डिजीटल अभ्याससारख्या विविध गोष्टी नव्याने समोर आल्या आहे, अनेक पालक आपल्या मुलांना लहान वयातच खूप साऱ्या ट्यूशन, ग्रूमिंग क्लासेसला पाठवतात, ज्याचा काही मुलांवर तणाव येत असल्याचे दिसत आहे. तसं मुलांबाबत पालकांनाही अनेक प्रकारचे टेन्शन असतात. यामध्ये त्यांना चांगले शिक्षण देण्यापासून त्यांना चांगल्या सवयी लावण्यापर्यंत अनेक गोष्टींचा समावेश आहे, परंतु या प्रक्रियेत अनेक वेळा काही पालक लक्ष देत नाहीत किंबहुना देऊ शकत नाही. यामुळे मुलांवर एक वेगळाच दबाव निर्माण होतो, ज्यामुळे ते अनेक प्रकारच्या मानसिक विकारांना बळी पडू शकतात. आज आम्ही तुम्हाला मुलांच्या मानसिक समस्यांचं नेमकं काय कारण असू शकतं याबाबत सांगणार आहोत. एका वृत्तसंस्थेने घेतलेल्या मुलाखतीनुसार शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ, भौतिकशास्त्राचे व्याख्याते आणि मार्गदर्शक नितीन विजय यांनी याबाबत माहिती दिली आहे. जाणून घेऊया..
बदलत्या काळानुसार शिक्षण व्यवस्थेत बदल
बदलत्या काळामुळे लोकांची विचारसरणी, जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींमध्येही झालेला बदल दिसून येतो. मात्र, या बदलामध्ये इतरही अनेक गोष्टींचा समावेश आहे, त्यातील एक म्हणजे शिक्षण व्यवस्था. वाचन आणि लेखनाचा चांगल्या भविष्याशी थेट संबंध आहे. पण यामुळे मुलांवर सुरुवातीपासूनच वेगळ्या प्रकारचे दडपण असते, त्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक प्रकारच्या मानसिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. लहान वयातच मुलांमधील वाढत्या मानसिक समस्या हा चिंतेचा विषय आहे. बाहेर चाललेली स्पर्धा पाहता विद्यार्थ्यांवर चांगल्या कामगिरीचे वेगळेच दडपण असते. यामुळे त्यांना राग, आक्रमक आणि आत्मविश्वास कमी वाटू शकतो. त्यामुळे डोकेदुखी, पोटदुखी, निद्रानाश यांसारखी लक्षणेही जाणवू शकतात. काही प्रकरणांमध्ये, या मानसिक समस्या स्वतःला हानी पोहोचवण्याचे कारण बनू शकतात.
मुलांचे मानसिक आरोग्य टिकवून ठेवायचंय? पालकांनो या गोष्टी लक्षात ठेवा
मानसिक आरोग्य समस्यांची लक्षणे ओळखा
जर तुमचे मूल नेहमी रागावत असेल, लोकांशी पूर्वीपेक्षा कमी संवाद साधत असेल, त्याच्या आहाराकडे लक्ष देत नसेल आणि त्याच्या झोपेच्या पद्धतीत बदल होत असेल तर ही तणाव आणि नैराश्याची लक्षणे आहेत. त्याची वेळीच ओळख करून घेतल्यास आपण त्याला गंभीर परिस्थितीपर्यंत पोहोचण्यापासून रोखू शकतो. वाचन आणि लेखन महत्त्वाचे आहे, परंतु मुलांवर इतका दबाव टाकू नका की ते लहानपणीही तणावाला बळी पडतील.
मोकळेपणाने संवाद साधा
अभ्यासासोबतच घर, शाळा, कोचिंग या सर्व ठिकाणी मुले त्यांच्या समस्यांवर मोकळेपणाने चर्चा करू शकतील असे वातावरण तयार करा. मुलांना हे स्वातंत्र्य देऊन तुम्ही त्यांना तणाव आणि नैराश्याला बळी पडण्यापासून वाचवू शकता. तसेच त्यांना समजावून सांगा की शारीरिकदृष्ट्या निरोगी असण्याइतकेच मानसिकदृष्ट्या निरोगी असणे देखील महत्त्वाचे आहे आणि जर त्यांना यासाठी एखाद्या तज्ज्ञाची मदत घ्यावी लागणार असेल तर तसे करण्यात अजिबात संकोच करू नका.
सामाजिक दबावापासून दूर राहा
त्यांना जगात होत असलेल्या निरोगी स्पर्धेबद्दल सांगा. यामुळे तणाव वाढण्याऐवजी वाचन, लेखन किंवा इतर कामासाठी प्रेरणा मिळते. ॉयामुळे मुले शैक्षणिक आणि इतर क्षेत्रात चांगली कामगिरी करतात.
हेही वाचा>>>
Child Health : पालकांनो..मोबाईलच्या व्यसनानं लहान वयातच मुलं होतायत 'सर्वाइकल पेन' चे शिकार, 'ही' लक्षणे दिसल्यास सतर्क व्हा
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )