Chest Pain Reason : छातीत दुखणे हे गॅस (Gas), ह्रदयविकाराचा झटका (Heart Attack) किंवा स्ट्रोक (Stroke) असल्याचं मानलं जातं. पण, प्रत्येक वेळी छातीत दुखण्याची हीच कारणे असू शकत नाहीत. छातीत दुखणे फुफ्फुसासंबंधित आजारांचं लक्षण असू शकतो. छातीत दुखण्याची समस्या फुफ्फुसांशीही संबंधित असू शकते आणि त्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. छातीत दुखणे हे कोणते फुफ्फुसाच्या कोणत्या आजाराचं लक्षण असू शकतं आणि ते कसं टाळावं, जाणून घ्या.


छातीत दुखणे असू शकतं एम्बोलिझम


सामान्य छातीत दुखणे हे फक्त ह्रदयविकाराचं नाहीतर एम्बोलिझममुळे असू शकतो. फुफ्फुसांमध्ये जेव्हा रक्ताच्या गुठळ्या तयार होतात, त्याला पल्मोनरी एम्बोलिझम असं म्हटलं जातं. या गुठळ्यांमुळे फुफ्फुसातील धमन्यांमधील रक्ताभिसरणात अडथळा निर्माण होतो. बहुतेक रक्ताच्या गुठळ्या पायांच्या नसांमधून सुरू होतात आणि फुफ्फुसापर्यंत पोहोचतात आणि ही स्थिती अत्यंत गंभीर आहे. जर एखाद्याला वारंवार छातीत दुखत असेल, श्वास घेण्यात अडचण येत असेल, श्वास घेण्यास त्रास होत असेल तसेच चालणे किंवा बोलण्यात अडचण येत असेल तर, तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.


फुफ्फुसांमध्ये गुठळ्या आणि हृदयविकाराचा झटका यातील फरक


फुफ्फुसामध्ये रक्ताच्या गुठळ्या होऊन लंग अटॅक येण्याचा धोका असतो. फुफ्फुसाच्या गुठळ्या झाल्यास, तुम्हाला हृदयविकाराचा झटका आल्यासारखे वाटेल. अनेकदा तीव्र वेदना होते आणि जेव्हा तुम्ही दीर्घ श्वास घेता तेव्हा वेदना आणखी वाढते. याशिवाय जेवताना, शिंकताना, वाकताना, फुफ्फुसात किंवा छातीत विचित्र वेदना होतात. ही फुफ्फुसांमध्ये गुठळ्या होण्याची लक्षणे असून याकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करा.


लंग अटॅक किंवा फुफ्फुसात गुठळी होण्याची लक्षणे


फुफ्फुसात गुठळी होण्याच्या सामान्य लक्षणांमध्ये श्वास घेण्यास त्रास होणे, छातीत दुखणे, चक्कण येणे, हृदयाचे ठोके नियंत्रणात नसणे, हृदयाचे ठोके जलद होणे, घाम येणे, ताप येणे आणि पाय सुजणे यांचा समावेश होतो.


फुफ्फुसाच्या गुठळ्या होणं कसं टाळायचं?


फुफ्फुसातील रक्ताच्या गुठळ्या होणं कसं टाळता येईल हे जाणून घ्या. फुफ्फुसामध्ये रक्ताच्या गुठळ्या होणं टाळण्यासाठी संतुलित आहार घेणं आवश्यक आहे. शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त आणि सक्रिय राहणे गरजेचं आहे. धूम्रपान टाळावं, जास्त वेळ पायाची घडी घालून बसू नये, घट्ट बसणारे कपडे घालू नये आणि वजन नियंत्रित ठेवावं.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Cardiac Arrest : फिटनेस फ्रिक लोकांना हार्ट अटॅकचा जास्त धोका! व्यायाम ठरतोय मृत्यूचं कारण?