Cancer Vaccine : आपल्यातील बहुतेकांना कर्करोगाचं (Cancer) नाव घेतलं तरी समोर मृत्यू दिसतो. इतकी भीती कर्करोगाबद्दल लोकांच्या मनात आहे. याचं कारण हा सर्वाधिक धोकादायक आजार आहे. कर्करोगाचा उपचार करण्यासाठी अनेक अडचणींना समोरे जावं लागू शकतं. यामुळे शरीरातील कर्करोगच्या पेशींसोबत इतर चांगल्या पेशींचंही नुकसान होऊ शकतं. दरवर्षी मोठ्या संख्येने लोक कॅन्सरच्या विळख्यात सापडतात. परंतु, सध्या वैद्यकीय क्षेत्रातील अमुलाग्र बदलांमुळे, आधुनिक संशोधनामुळे पूर्वीपेक्षा चांगला उपचार मिळत आहे. यानंतर कर्करोगमुळे दगावणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. कारण बहुतांश लोकांना कर्करोगाची सुरुवातीची लक्षणेच समजून येत नाहीत. हा आजार धोकादायक स्टेजवर पोहोचल्यानंतर रुग्णांना समजतं. परंतु, आता कर्करोगचा धोका कमी करण्यासाठी कर्करोगच्या लसीचं (Cancer Vaccine) ट्रायलही घेतलं जात आहे. यामुळे आता लवकरच कर्करोगावर चांगला उपचार मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


कॅन्सरच्या लसीचं  घेतलं जात आहे ट्रायल   


आता येत्या काळात कर्करोगाची लस येण्याची शक्यता आहे. यासाठी मोठ्या पातळीवर संशोधन आणि ट्रायल घेतलं जातं आहे. कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी जगभर कामही केलं जात आहे. वॅक्सिन फॉर्म्युलेशन, सहायक आणि इम्युनोस्टिम्युलेटरी तंत्रज्ञानाचा शोध घेण्याचा प्रयत्नही केला जात आहे. यामध्ये काही देशांत चौथ्या स्टेजचं ट्रायलही  पूर्ण झालं आहे. यामुळे या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, आता लवकरच कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारावर चांगला उपचार मिळू शकतो. 


कॅन्सरच्या लसीचे प्रकार 


1. प्रतिबंधात्मक लस (Preventive vaccine)


माणूस जन्माला आल्यापासून त्याच्या शिशु वयापासून ते तारुण्यापर्यंत वेगवेगळ्या लसी दिल्या जातात. यामुळे भविष्यात धोकादायक संसर्गजन्य रोगांविरोधात लढा देण्यासाठी तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढते. यामुळे काही धोकादायक संसर्गजन्य रोगांवर लसी दिल्या जातात. यामध्ये मानवी पॅपिलोमाव्हायरस लस (HPV) आणि हिपॅटायटीस बी लस (HBV) आहे. या लसींमुळे काही व्हायरससारख्या आजारापासून संरक्षण मिळू शकतं. हे असे आजार आहेत जे कर्करोगाचा धोका वाढवू शकतात. ही लस टोचून घेतल्यामुळे संसर्गजन्य रोगांची काही प्रमाणात जोखीम कमी होते.


2. वैद्यकीय लस (Medical Vaccine)


जी लोक कर्करोगाच्या आजारानं पीडित आहेत त्या लोकांना 'वैद्यकीय लस' दिली जाते. या लसींमुळे शरीरातील कर्करोगाच्या पेशींविरोधात लढण्यासाठी प्रतिकारशक्ती तयार होते. अजूनही कर्करोगाच्या आजाराची जोखीम कमी करण्यासाठी HPV Vaccine देण्याचा सल्ला दिला जातो. यासोबत लिव्हरचा कॅन्सर होऊ नये म्हणून हिपॅटायटीस बी या आजाराची लस टोचली जाते. यामुळे सध्या तरी कर्करोग पूर्णपणे बरा होईल, अशी कोणतीही लस आलेली नाही. परंतु, भविष्यात कर्करोगावर प्रभावी लस येण्याची शक्यता आहे.


कर्करोगावर लस आल्यानंतर केमोथेरपी-रेडिओथेरपीचं काय?


वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, कर्करोगाची लस आल्यानंतर केमोथेरपीची पद्धत बंद केली जाऊ शकते. कारण केमोथेरपीमुळे शरीरातील खराब पेशींसोबत चांगल्या पेशीही नष्ट होतात. या उपचार पद्धतीत रुग्णांच्या शरीरावर दुष्परिणाम होतात. यामुळे रुग्णांच्या शरीरातील चांगल्या पेशी कमी होऊन प्रतिकारशक्ती कमजोर होते. यामुळे रुग्णाला प्रमाणाबाहेर अशक्तपणा जाणवू शकतो. कर्करोगावर लस आल्यानंतर केमोथेरपी उपचार पद्धतीवर बंद केली जाऊ शकते. परंतु, कर्करोगाच्या शस्त्रक्रियेचे उपचार उपलब्ध असतील. कारण कर्करोग फक्त ट्यूमरची शस्त्रक्रिया केल्यानंतरच दूर होऊ शकतो. 


लसीमुळे कर्करोगाचा धोका कमी होईल का?


येत्या काही वर्षात कर्करोगाची लस उपलब्ध होऊ शकते. कर्करोगावर लस आल्यामुळे या जीवघेण्या आजारात उपचारासाठी मोठी मदत होऊ शकते. या लसीमुळे कर्करोगाच्या पेशींविरोधात लढण्यासाठी शरीराची रोगप्रतिकारशक्तीही मजबूत होईल. यासोबत उपचारही चांगला मिळू शकतो. परंतु, सध्या कर्करोगावर लस उपलब्ध करण्यासाठी अनेक आव्हानं उभी आहेत. तरीही लवकरच कर्करोगावर लस उपलब्ध होईल, अशी अपेक्षा केली जात आहे. 


हेही वाचा:


Diet soda sweetener : 'हा' पदार्थ ठरु शकतो कर्करोगासाठी आमंत्रण? कर्करोगजन्य गोष्टींच्या यादीमध्ये समावेश करण्याची शक्यता