Silent Cancers : कॅन्सर हा एक गंभीर आजार आहे. कॅन्सरची बहुतेक लक्षणं सुरुवातीला दिसत नाहीत आणि त्यामुळेच साध्या पोटदुखी आणि पाठदुखीला आपण हलक्यात घेतो. अर्थात पोट आणि पाठीत दुखलं म्हणजे कॅन्सरची सुरूवात झाली असं म्हणता येत नाही. पण, जर तुम्ही दिर्घकाळ कोणत्याही समस्येने त्रस्त असाल तर वेळीच याची दखल घेणं गरजेचं आहे. सायलेंट कॅन्सरचा सर्वात धोकादायक प्रकार म्हणजे तो सुरुवातीला आढळून येत नाही. मात्र, कॅन्सरची सुरुवातीची काही लक्षणं आहेत जी तुम्हाला शरीरात दिसू लागतात. आज या ठिकाणी कॅन्सरची काही लक्षणं आहेत ज्याकडे दुर्लक्ष केल्यास महागात पडू शकतात.   


सर्वाईकल कॅन्सर


सर्वाईकल कॅन्सर गर्भाशयाच्या पेशींमध्ये होतो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या म्हणण्यानुसार, सर्व गर्भाशयाचा कर्करोग पॅपिलोमाव्हायरस संसर्गाशी संबंधित आहे. साधारणपणे, सुरुवातीच्या काळात गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची कोणतीही लक्षणं दिसत नाहीत. पण, हळूहळू ही लक्षणं शरीरात पसरू लागतात. मासिक पाळीच्या दरम्यान पाणीदार स्त्राव होणे.


गर्भाशयाचा कर्करोग


गर्भाशयाच्या कर्करोगात पेशी अनियंत्रितपणे वाढू लागतात. स्त्रियांमध्ये कर्करोगाच्या मृत्यूचं प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळेच यावर वेळीच उपचार घेणं गरजेचं आहे. यामध्ये दिसणारी लक्षणं म्हणजे, ओटीपोटात दुखणे, पोट फुगणे किंवा वारंवार लघवी होणे किंवा वजन कमी होणे होऊ शकते.


पोटाचा कर्करोग 


कोलन कॅन्सर हा मोठ्या आतड्याचा कर्करोग आहे. यामध्ये सहसा कोलनमध्ये वाढणाऱ्या पॉलीप्स नावाच्या पेशींच्या लहान, सौम्य 'गठ्ठा' तयार होतो. याला जर तुम्ही हलक्यात घेतले तर कोलन कॅन्सर होऊ शकतो. या लक्षणांमध्ये सामान्यत:  अतिसार किंवा बद्धकोष्ठतेचा समावेश असतो.   


स्वादुपिंडाच्या कर्करोगाचे लक्षण


स्वादुपिंडाचा कर्करोग तेव्हा होतो जेव्हा स्वादुपिंडातील पेशी अनियंत्रितपणे वाढतात, ज्यांना ट्यूमर देखील म्हणतात. बहुतेक स्वादुपिंडाचे कर्करोग 65 वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांमध्ये आढळतात. धूम्रपानामुळे मधुमेह आणि स्वादुपिंडाच्या कर्करोगात बहुतेक अनुवांशिक समस्या देखील उद्भवू शकतात.


या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका: वजन कमी होणे, पोटदुखी, डोळे आणि त्वचा पिवळसर होणे, थकवा ही या आजाराची लक्षणे असू शकतात.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्त्वाच्या बातम्या :


Health Tips : गुलाबी थंडीत 'या' चहाने तुमच्या दिवसाची सुरुवात करा; प्रतिकारशक्ती वाढविण्याबरोबरच व्हायरलपासूनही संरक्षण मिळेल