Blood Pressure Patient Health Tips : अलिकडच्या काळात रक्तदाब म्हणजेच ब्लड प्रेशरची (Blood Pressure) समस्या खूप सामान्य झाली आहे. बहुतेक व्यक्तींना ब्लड प्रेशरचा त्रास जाणवत आहे. यावर उपाय म्हणून काही लोक औषधं घेतात, तर काही जण रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी मीठ वगळतात. आता शास्त्रज्ञांनी रक्तदाबावर नवीन उपचार पद्धती शोधली आहे. आता आनुवंशिकता चाचणी (Gene Test) द्वारे आता रक्तदाबावरील उपचार ठरवता येणार आहे. जीन्स टेस्ट (Genes Test) रक्तदाबावर उपचार म्हणून मीठ वगळणं की औषधं घेणं जास्त लाभदायी ठरेल, हे कळणार असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.


रक्तदाबाच्या उपचारात मोठी क्रांती


ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञांनी यासंदर्भात एक शोध लावला आहे.  हे संशोधन उच्च रक्तदाबाच्या उपचारात मोठी क्रांती घडवून आणू शकतो. ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञांच्या पथकांनी केलेल्या संशोधनानुसार, व्यक्तीच्या जनुकांच्या म्हणजेच आनुवंशिकतेच्या आधारावर मीठ कमी करणाऱ्या औषधांनी कोणता रुग्ण बरा होईल याचा अंदाज लावता येतो, असा दावा या शास्त्रज्ञांनी केला आहे.


दरवर्षी अब्जावधी रुपयांची बचत


या संशोधनाच्या अहवालानुसार, रक्तदाबाच्या प्रत्येक रुग्णाला एकसारखी औषध देण्याची गरज भासणार नाही. आता डॉक्टर रुग्णाच्या जीन्सनुसार, योग्य औषध देऊ शकतील, ज्यामुळे रुग्णांवरील उपचार अधिक प्रभावी आणि किफायतशीर होतील. या शोधामुळे जगभरात दरवर्षी अब्जावधी रुपयांची बचत होऊ शकते, असा शास्त्रज्ञांचा दावा आहे. तसेच योग्य उपचाराने उच्च रक्तदाबामुळे होणारे मृत्यूही कमी होतील.


उपचार अधिक प्रभावी आणि किफायतशीर होणार


या अहवालानुसार, उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी यापुढे 'एक औषध सर्वांसाठी योग्य' अशी परिस्थिती राहणार नाही. प्रत्येक रुग्णाला त्याच्या गरजेनुसार औषध दिले जाईल, ज्यामुळे उपचार अधिक प्रभावी आणि किफायतशीर होतील.


अधिक संशोधन सुरु


हा शोध अजूनही संशोधनाच्या टप्प्यावर आहे, पण भविष्यात उच्च रक्तदाबाच्या उपचारात मोठा बदल घडवून आणू शकतो. उच्च रक्तदाबाच्या उपचारात शास्त्रज्ञांनी मोठे शोध लावले आहेत. आता रुग्णाच्या जनुकांच्या आधारे योग्य औषध शोधता येईल. हे उपचार अधिक प्रभावी आणि आर्थिक बनवेल. जगभरात कोट्यवधी रुपयांची बचत होऊ शकते.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Alcohol Side Effect : 'या' व्यक्तींसाठी अल्कोहोलचं सेवन धोकादायक, दारुपासून दूर राहणंच फायदेशीर