Bird Flu in India 2021 Live Updates | देशात कोरोनापाठोपाठ बर्ड फ्लूचं संकट

Bird Flu in India 2021 Live Updates : कोरोनानंतर हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब, केरळमध्ये ओढावलं नवं संकट. महाराष्ट्रात अद्यापही संकट नाही. अंडी आणि चिकन विक्रीवर बंदी. बिहार, उत्तराखंड आणि झारखंडमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 06 Jan 2021 12:04 PM

पार्श्वभूमी

Bird Flu in India 2021 Live Updates : कोरोना विषाणूच्या संसर्गाचं संकट पूर्णपणे टळत नाही, तोच देशावर आणखी एका साथीचं संकट आलं आहे. ज्या धर्तीवर काही राज्यांमध्ये सतर्कतेचा इशाराही देण्यात आला...More

मध्य प्रदेशचे मंत्री विश्वास सारंग यांनी सांगितलं की केरळमधून आयात करण्यात आलेल्या कोंबड्यांच्या माध्यमातून या व्हायरसचे संक्रमण झालेलं आहे. त्यामुळे केरळ मधून करण्यात येत असलेल्या कोंबड्यांच्या आयातीवर लक्ष ठेवण्यात येत आहे आणि या व्हायरसचे संक्रमण मध्य प्रदेशमध्ये होणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे. यासाठी रॅन्डम चेकिंगच्या मार्गाचा वापर करण्यात येईल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.