Best Raisins For Health: ड्रायफ्रुट्स (Dry Fruits) म्हणजेच, सुका मेवा... आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आणि परिपूर्ण ठरणाऱ्या ड्रायफ्रुट्सचा आहारात समावेश करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून नेहमीच दिला जातो. ड्रायफ्रुट्समध्ये प्रोटीन, कॅल्शियम (Calcium) आणि आयर्न (Iron) यांचा खजिना असतो. आयुर्वेदातही सुका मेवा आरोग्यासाठी शक्तिशाली आणि फायदेशीर मानला जातो. याच सुक्या मेव्यात समाविष्ट होणारा मनुकाही आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी ठरतो. तुमच्या दररोजच्या आहारात मनुक्याचा (Raisins) समावेश करणं खूपच गुणकारी ठरतं. पण बाजारात मनुके खरेदीसाठी गेल्यानंतर पटकन लक्षात येत नाही की, नेमके कोणत्या रंगाचे मनुके विकत घ्यावेत. मार्केटमध्ये विविधरंगाचे मनुके मिळतात. काळे मनुके, हिरवे मनुके, लाल मनुके आणि पिवळे मनुके तुम्हाला अगदी सहज बाजारात मिळतात. सर्वच मनुके आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. पण सर्वाधिक फायदेशीर मनुका कोणात हे तुम्हाला माहितीय का? 


मनुक्यामध्ये आढळणारी पोषक तत्व (Raisins Nutrition)


मनुक्याचा समावेश ड्रायफ्रुट्समध्ये केला जातो. मनुका तसं पाहायला गेलं तर बदामापेक्षा स्वस्त आणि टेस्टी असतो. द्राक्षापासून मनुका तयार होतो. द्राक्ष सुकल्यानंतर त्यापासून मनुका तयार होतो. मनुक्यात पोषक तत्वांचा भंडार आहे. यामध्ये मुबलक प्रमाणात प्रोटीन, आयर्न आणि फायबर आढळून येतं. मनुक्यात व्हिटॅमिन बी6, कॅल्शियम, पोटॅशियम आणि कॉपरही असतं. मनुक्यात अँटिऑक्सिडंट आणि अँटिबॅक्टेरियल गुणधर्म आढळून येतात. तसेच, मनुक्यात व्हिटॅमिन ई आणि हेल्दी फॅटचा सोर्स आहे. 


कोणत्या रंगाचा मनुका सर्वात फायदेशीर? (Which Raisins Is Best?)


आरोग्यवर्धक गुणधर्मांचा मुबलक पुरवठा मनुक्यात असतो. तसं पाहायला गेलं तर सर्वच मनुके आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. तुम्ही बिनधास्त त्यांचा आहारात समावेश करू शकता. पण त्यातल्यात्यात सुल्तान मनुका, ज्याला गोल्डन मनुका म्हणतात, तो आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर, पोटॅशियम, आयर्न आणि अनेक मिनरल्स असतात. त्यामुळे सुल्ताना मनुक्याचा आहारात समावेश करणं फायदेशीर ठरतं. दरम्यान, मनुका आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असला तरी, एका मार्यादेपलिकडे त्याचं सेवन करणं आरोग्यासाठी घातक ठरेल. तसेच, यामुळे इतर समस्याही उद्भवू शकतात. मनुके खूप गोड असतात, ज्यामुळे वजन वाढण्यास मदत होते. मनुका खाण्याचा योग्य मार्ग म्हणजे, त्यांना रात्रभर भिजवून सकाळी रिकाम्या पोटी सेवन करणं. 


(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Symptoms of Prostate Cancer: ब्रिटनचे किंग चार्ल्स III यांना प्रोटेस्ट कॅन्सरचं निदान; याची नेमकी लक्षणं काय?