Health Tips : वयाची तिशी उलटली की माणसाच्या शरीरात अनेक बदल होऊ लागतात. काही प्रमाणात अशक्तपणा जाणवू लागतो. प्रत्येकाच्या शरीरात बदल  घडतात, ज्यांमुळे तंदुरुस्त राहणं एक आव्हान बनतं. तिशीनंतर आहारावर विशेष लक्ष देणं गरजेचं होतं. आहारात फळांच्या ज्यूसचं सेवनं करावं. यामध्ये संत्रे द्राक्षे अथवा लिंबू यांचा समावेश करावा. जेणेकरुन  रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होईल. खालील काही गोष्टींचा आहारात नियमित समावेश केल्यास वजन कमी होतेच शिवाय हृदयविकाराचा धोका कमी होतो.   


ब्रोकोली - 
ब्रोकोली आरोग्यासाठी अतिशय उत्तम मानले जाते, हे जीवनसत्त्वांचे भांडार आहे. ब्रोकोलीमुळे रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. तसेच हाडेही मजबूत होतात. त्यामुळे आहारात ब्रोकोलीचा समावेश आवर्जुन करावा.  


लसूण - 
लसणामुळे पचन शक्ती वाढते शिवाय पोटासंबंधी आजार दूर होतात. यासोबतच शरीरात असणाऱ्या घातक सूक्ष्मजीवांनाही लसूण नष्ट करतो. तसेच रोगप्रतिकारक शक्ती सुधारते. लसणामुळे शरीरावरील इन्फेक्शन दूर होते आणि पोटातील जंतूही नष्ट होतात.  


तेलकट मासे -
सॅल्मन आणि ट्राउट यासारखे तेलकट मासे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. या माशांमुळे शरीरात हवे असलेले आवश्यक हार्मोन्स तयार होण्यास मदत होते. हे मासे मेंदू आणि हृदयासाठी अतिशय पोषक काम करतात. त्याशिवाय चरबीपासून रक्तवाहिन्यांतील कोलेस्टेरॉल वाढत नाही व आहारात त्यांचा समावेश केल्याने रक्तदाब कमी होतो. तेलकट माशांमध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड मोठ्या प्रमाणात असते, याचा आपल्या शरीराला फायदा होतो.  


सुकामेवा -
सुकामेवामुळे वजन कमी करण्यास मदत करतो. यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटिन आणि फायबर असतात. याचा निरोगी आरोग्यसाठी फायदा होतो. 


मध -
मागील पाच हजार पेक्षा जास्त वर्षांपासून मध औषध म्हणून वापरलं जातेय. अनेक औषधांवर रामबाण उपाय म्हणून वापर केला जातो. मधामध्ये अँटिसेप्टिक, अँटिऑक्सिडंट आणि बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म आहेत. आरोग्यशिवाय काही जण मधाचा वापर कॉस्मेटिकसाठी करतात.  


चिया बिया -
चिया बिया या पौष्टिक गुणधर्मांनी परिपूर्ण असतात.  यामध्ये मोठ्य प्रमाणात फायबर, ओमेगा-3 फॅटी अॅसीड आणि मॅग्नेशियम असतात. चिया बियाण्यामध्ये प्रोटिनही मोठ्या प्रमाणात असते. चिया बियामुळे भूक नियंत्रणात राहण्यासम मदत होते. चिया बियामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते. फायबर एक असा घटक आहे जो वजन कमी करण्यास तसेच वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करतो.  आपल्या आहारात नक्कीच चिया बियाणे समाविष्ट करा.