Worst Workout For Knees : तुम्ही नेहमी ऐकले असेल की वर्कआउट केल्याने हाडे मजबूत होतात. यासोबतच स्नायूंची ताकदही वाढते. या गोष्टींबद्दल शंका नाही. तसेच वर्कआउट्सचे असे कोणतेही तोटे नाहीत ज्यामुळे व्यायाम न करण्याचा सल्ला दिला जातो. परंतु हे देखील लक्षात ठेवणं आवश्यक आहे की भिन्न लोक, वयोगट आणि शरीराच्या प्रकारांवर वर्कआउटचे वेगवेगळे परिणाम होतात. विशेषतः वयाच्या 35 ते 40 नंतर जर तुम्ही व्यायाम करत असाल तर शरीराच्या हाडांची आणि सांध्यांची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. या वयात जड कसरत केल्याने हाडांना फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकते. विशेषतः गुडघ्याचा सांधा.  जर तुमच्या गुडघ्यांमध्ये थोडासाही त्रास असेल तर समजून घ्या की वर्कआउटमुळे त्यांचे नुकसान होत आहे.
 
'या' व्यायामामुळे नुकसान होऊ शकते


गुडघ्यामध्ये समस्या असल्यास, विशिष्ट प्रकारचे वर्कआउट टाळणे योग्य आहे. डीप स्क्वॅट्स आणि गुडघ्या संबंधित व्यायाम आहेत जे गुडघ्यांवर दबाव आणतात. गुडघा कमकुवत असेल तर या व्यायामांपासून दूर राहणे हाच उत्तम उपाय आहे. आणि, जर तुम्ही या व्यायामांमध्ये नवीन असाल तर ते एखाद्या ट्रेनरसमोर करा. चुकीच्या पद्धतीने केलेले हे वर्कआउट गुडघ्यांनाही हानी पोहोचवू शकतात.
 
गुडघे कसे वाचवायचे?


गुडघ्यांचे संरक्षण करण्यासाठी, कोणत्याही व्यायामापूर्वी वॉर्म-अप करा. हळू जॉग किंवा स्ट्रेचिंग करा जेणेकरून गुडघे वॉर्म होतील. वॉर्म-अपमुळे रक्त परिसंचरण वाढते आणि स्नायूंच्या ताणाचा धोका कमी होतो. 
जर तुम्ही नवीन असाल तर कमी प्रभावाच्या वर्कआउटपासून सुरुवात करा. जेव्हा शरीराला वर्कआउटची सवय होईल तेव्हाच हेव्ही वर्कआउट करायला सुरुवात करा.  
आहारात अशा गोष्टींचा समावेश करा ज्या स्नायू आणि हाडे दोन्ही मजबूत करण्यासाठी उपयुक्त आहेत. 
गुडघेदुखीच्या बाबतीत, डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि वेदना कायम असेपर्यंत वर्कआउट्स अजिबात करू नका.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्त्वाच्या बातम्या :


Health Tips : गुलाबी थंडीत 'या' चहाने तुमच्या दिवसाची सुरुवात करा; प्रतिकारशक्ती वाढविण्याबरोबरच व्हायरलपासूनही संरक्षण मिळेल