Kidney Stone Symptoms : बदलत्या जीवनशैलीत आपलं शरीर खूप चांगलं ठेवण्याची गरज आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही अनहेल्दी जीवनशैलीच्या आहारी गेलात तर काही गंभीर आजार तुम्हाला होऊ शकतात. यापैकी एक आजार म्हणजे किडी स्टोन (मूतखडा). किडनी स्टोनमुळे सांध्यामध्ये वेदना आणि सूज सुरू होते. याच्या रुग्णांनी जरा निष्काळजी राहिल्यास तो गंभीर स्वरूप धारण करू शकतो. अशा परिस्थितीत, आपण आपल्या जीवनशैलीची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. 


किडनी स्टोनची लक्षणे कोणती?



  • मलविसर्जन करताना तीव्र वेदना होतात

  • वारंवार शौच करण्याची इच्छा तीव्र होते

  • ओटीपोटात दुखणे

  • भूक न लागणे

  • मळमळ होणे

  • ताप येणे


'या' पदार्थांसोबत मीठ खाऊ नका


मिठाचा जास्त वापर करणे टाळा


अन्नामध्ये जास्त मीठ वापरणे खूप धोकादायक ठरू शकते. यामुळे किडनी स्टोनची समस्या उद्भवू शकते. जेवणात जास्त मीठ खाल्ल्याने लघवीत कॅल्शियमचे प्रमाण वाढते, त्यामुळे स्टोनचा धोका वाढतो. 


कोल्ड्रिंक्स पिणे धोकादायक ठरू शकते


किडनी स्टोनच्या रुग्णांनी थंड पेय आणि चहा-कॉफीपासून लांब अंतर ठेवावे. स्टोनच्या रुग्णांना डिहायड्रेशनची समस्या असते. कोल्ड ड्रिंक्समध्ये असलेल्या अॅसिडमुळे स्टोनचा धोका वाढतो. 


मांसाहार सोडून द्या


मांसाहारामध्ये भरपूर प्रथिने आढळतात, त्यामुळे ते टाळावे. जेव्हा जेव्हा स्टोन आढळतो तेव्हा अन्नामध्ये मीठ आणि प्रथिने कमी केली पाहिजेत. 


टोमॅटो


टोमॅटोचा वापर मुख्यतः अन्नामध्ये केला जातो. टोमॅटोमध्ये ऑक्सलेटचे प्रमाण जास्त असते. जे स्टोन असलेल्या रुग्णासाठी धोकादायक ठरू शकतात. जर तुम्हाला टोमॅटो जास्त आवडत असेल तर भाजीत घालण्यापूर्वी त्याच्या बिया काढून टाका. 


मुतखड्यावर घरगुती उपाय कोणते?



  • टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन ए आणि सीचं प्रमाण जास्त असल्याने मूतखडा विरघळण्यास मदत होते. 

  • रोज सकाळी टोमॅटो बिया काढून खाल्ल्याने शरीरातील अॅसिडचं प्रमाण कमी होतं. 

  • दिवसातून किमान आठ ते दहा ग्लास पाणी प्यायला हवं.

  • दिवसातून दोन वेळा शतावरीचा ताजा रस घेतल्याने मूतखडा विरघळून जाण्यास मदत होते. 

  • निवडुंगाचा चिक दुधातून घेतल्याने लघवी मार्गातील समस्या दूर होतात.शेवग्याच्या पानांचा काढा करून त्यात खाण्याचा सोडा घालावा, हा काढा घेतल्याने मूतखडा निघून जाण्यास मदत होईल. 

  • गोखरूचं चूर्ण पाण्यात उकळून दिवसातून दोन वेळा घेतल्याने लघवी साफ होईल.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्त्वाच्या बातम्या :


Health Tips : गुलाबी थंडीत 'या' चहाने तुमच्या दिवसाची सुरुवात करा; प्रतिकारशक्ती वाढविण्याबरोबरच व्हायरलपासूनही संरक्षण मिळेल