Health Tips : शारदीय नवरात्रीची सुरुवात झाल्यामुळे देशभरात आनंदाचे वातावरण आहे. नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवात लोक दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा करतात. तसेच या काळात अनेक लोक उपवास करून देवीची पूजा करतात. नवरात्रीत लोक अनेक नियम पाळतात. या काळात लोक मांसाहारी पदार्थ, लसूण, आले आणि सामान्य मीठ यांपासून दूर राहतात. उपवासा दरम्यान, लोक सहसा सामान्य मीठ (Salt) टाळतात आणि त्याचा पर्याय म्हणून सैंधव मीठ वापरतात. पण, तुम्ही कधी विचार केला आहे का की उपवासाच्या वेळी सैंधव मीठ का वापरले जाते? जर तुम्हाला याचे कारण माहित नसेल तर या ठिकाणी आम्ही तुम्हाला उपवासाच्या वेळी सैंधव मीठ खाण्याचे कारण आणि त्याचे काही आश्चर्यकारक फायदे सांगणार आहोत.


उपवासाच्या वेळी सैंधव मीठ का खाल्ले जाते?


साधारणपणे उपवासाच्या वेळी सैंधव मिठाचा वापर केला जातो. उपवासाच्या वेळी हलके आणि पचायला सोपे असलेले पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो आणि शरीराला डिटॉक्सिफाई करण्यास मदत होते. सैंधव मीठ तुमचे अन्न शुद्ध आणि आरोग्यदायी तर बनवतेच पण ते निरोगी देखील बनवते.


उपवासा दरम्यान सैंधव मीठ हा एक चांगला पर्याय मानला जातो. कारण हा मिठाचा सर्वात शुद्ध प्रकार आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची प्रक्रिया केली जात नाही. साधे मीठ बनवण्यासाठी अनेक रासायनिक प्रक्रिया त्यावर केल्या जातात आणि त्यात आयोडीनही भरपूर असते.


उपवासाच्या वेळी सैंधव मिठाचे फायदे


उपवासाच्या वेळी सैंधव मीठ खाणं फायदेशीर आहे, कारण ते शरीराला आतून थंड ठेवते. सैंधव मिठामध्ये सोडियमचे प्रमाण कमी आणि पोटॅशियमचे प्रमाण जास्त असल्याने ते तुमच्या शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचे स्तर राखून ठेवते, त्यामुळे ऊर्जा वाढते, जी तुम्हाला उपवासाच्या वेळी सक्रिय ठेवण्यासाठी आवश्यक असते. 



  • सैंधव मिठामध्ये लोह, जस्त, निकेल, मॅंगनीज आणि इतर खनिजे असतात, जी शरीरासाठी चांगली असतात.

  • सामान्य मिठाच्या तुलनेत त्यामध्ये सोडियमचे प्रमाण कमी असल्याने, सैंधव मीठ शरीरातील सोडियमचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करू शकते.

  • हे स्नायूंच्या उबळ कमी करण्यास आणि आपल्या शरीरातील कार्य सुधारण्यास मदत करू शकते.

  • आयुर्वेदानुसार सैंधव मीठ पचनास मदत करते. जसे की, आतड्याचे आरोग्य सुधारण्यास, संक्रमणांशी लढा देण्यास, अतिसार इ.

  • सैंधव मीठ त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत करू शकते. त्यामुळे त्वचा निरोगी होण्यास मदत होऊ शकते.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :


Hair Care Tips : केसांसाठी 'ही' हेअर ट्रीटमेंट होऊ शकते धोकादायक! वेळीच आपल्या केसांची काळजी घ्या