Hair Care Tips : शारीरिक आरोग्याबरोबरच केसांची (Hair Care Tips) काळजी घेणेही तितकेच गरजेचे आहे. आपले केस सॉफ्ट, घनदाट आणि चमकदार (Glow) बनवण्यासाठी आपण अनेक प्रकारचे उपचार घेतो. केसांवर अनेक प्रकारच्या ट्रीटमेंट्स घेतो. पण अनेक वेळा या ट्रीटमेंटमुळे (Treatment) केसांचं आणखी नुकसान होते. चमकदार, लांब आणि घनदाट केस सर्वांनाच आवडतात, पण, सुंदर दिसण्याच्या स्पर्धेत अनेक ट्रीटमेंट करून आपले केस आणखी कमकुवत होतात.


आपल्या जीवनशैलीचा (Lifestyle) थेट परिणाम त्वचेवर तसेच केसांवर दिसून येतो. ताणतणाव, हानिकारक प्रोडक्ट्सचा वापर आणि केसांची काळजी घेण्याच्या अनेक उपचारांमुळे केस गळण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात. चला तर जाणून घेऊयात कसेांच्या अशा कोणत्या ट्रीटमेंट्स आहेत जे केसांसाठी धोकादायक ठरू शकतात.


केराटिन ट्रीटमेंट (Keratin Treatment)


केराटिन ट्रीटमेंटचं नाव आपण अनेकदा ऐकलं असेल. चांगल्या केसांसाठी, लोक त्याचे परिणाम जाणून न घेता केराटिन ट्रीटमेंटचा वापर करतात. केराटिन ट्रीटमेंट बर्‍याच प्रकरणांमध्ये प्रभावी ठरते परंतु काही काळासाठीच ती आपल्या केसांसाठी चांगली वाटते. या ट्रीटमेंटमुळे केस दीर्घकाळ कमकुवत होतात. केसतज्ज्ञांच्या मते ही ट्रीटमेंट सर्व प्रकारच्या केसांसाठी योग्य नाही. त्यामुळे केस गळण्याचा धोका असतो.


कांद्याचं तेल (Onion Oil)


कांद्याचे तेल (Onion Oil) कोरोना नंतरच्या सौंदर्य उपचारांपैकी एक होते. केसगळती रोखण्यासाठी कांद्याचा रस वापरण्याबाबत आपण अनेकदा ऐकले आहे. पण यामुळे केसांनाही धोका होऊ शकतो. कांद्याचे तेल एक अँटी-ऑक्सिडेंट आहे ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात सल्फर असते जे तुमच्या केसांसाठी चांगले असते. पण या सल्फरमुळे तुमच्या केसांच्या त्वचेत जळजळही होऊ शकते. हे तेल केस गळण्यापासून बचाव करते असं म्हणतात मात्र, आतापर्यंत याबाबत कोणाताही शास्त्रीय पुरावा उपलब्ध नाही.


तसेच, जर तुम्ही निवडलेल्या केसांची काळजी घेण्याच्या ट्रीटमेंटमुळे तुमचे केस कोरडे आणि कमकुवत होत असतील किंवा तुमच्या केसांमध्ये कोंडा अधिक वाढत असेल, तर तुम्ही तुमच्या समस्येबद्दल चांगल्या डॉक्टरांचा वेळीच सल्ला घेणं आवश्यक आहे. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :


Skin Care Tips : चेहऱ्यावरच्या ऑईली स्किनने हैराण आहात? मुलतानी मातीचा स्पेशल फेस पॅक आहे रामबाण उपाय; जाणून घ्या कसा बनवायचा