Health Tips : खरंतर आपल्या अन्नात मीठ (Salt) फार गरजेचं आहे. मिठामुळे अन्नाची चव वाढते. मीठ सोडियमचा समृद्ध स्रोत देखील मानला जातो. सोडियममुळेच शरीरातील पेशी व्यवस्थित काम करतात. याशिवाय, हे इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन राखण्यास मदत करते. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, प्रत्येक व्यक्तीने दररोज 5 ग्रॅमपेक्षा कमी मीठ खाणं गरजेचं आहे असं म्हटलं आहे.
मात्र, आकडेवारीनुसार, भारतीय लोक 11 ग्रॅम मिठाचा वापर करताना दिसतात. हे प्रमाण फार जास्त आहे. खरंतर बाजारात अनेक प्रकारचे मीठ उपलब्ध आहे. मात्र, येथे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की. कोणते मीठ खाणे तुमच्या आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे.
सामान्य मीठ
खरंतर सामान्य मीठ प्रत्येक घरात आढळते. सामान्य मीठाची खास गोष्ट म्हणजे त्यात कोणत्याही प्रकारचा अशुद्ध कण नसतो. ही मीठ बनवण्यासाठी अनेक प्रक्रिया पार पाडाव्या लागतात. मुलांच्या विकासासाठी सामान्य मीठ खूप महत्वाचे आहे. मात्र, जास्त मीठ खाल्ल्याने देखील नुकसान होऊ शकते.
सैंधव मीठ
समुद्र किंवा तलावाचे खारे पाणी बाष्पीभवन झाल्यावर ते रंगीबेरंगी स्फटिक उरतात. यापासून रॉक सॉल्ट म्हणजे सैंधव मीठ तयार केलं जातं. सैंधव मीठ हे एक प्रकारचं खनिज आहे. याचं सेवन केल्यास अन्न कोणतीही रासायनिक प्रक्रिया न करता आरोग्यदायी ठरतं. सैंधव मिठालाच हिमालयीन मीठ, रॉक सॉल्ट, लाहोरी मीठ असंही म्हटलं जातं. रॉक सॉल्टमध्ये 90 हून अधिक खनिजं आढळतात. यामध्ये मॅग्नेशियम आणि सल्फरचे प्रमाण अधिक असते.
सी सॉल्ट
पाण्याचे वाफेत रूपांतर करण्याच्या प्रक्रियेद्वारे काळे मीठ तयार केले जाते. त्यात सोडियमची कमतरता आणि आयोडीनचे प्रमाण जास्त आहे. हे मीठ लवकर वितळते.
काळे मीठ
हे मीठ तयार करण्यासाठी अनेक प्रकारचे मसाले आणि झाडाची साल वापरली जातात. पोट फुगणे, बद्धकोष्ठता, आम्लपित्त आणि पोटदुखी यांपासून आराम देण्यासाठी काळे मीठ खूप फायदेशीर आहे.
कोणते मीठ जास्त फायदेशीर आहे?
आरोग्य तज्ज्ञांच्या मते कमी सोडियम असलेले मीठ जास्त फायदेशीर असते. समुद्री मीठ आणि सैंधव मीठ दोन्ही अधिक फायदेशीर आहेत. या दोन्हीमध्ये सामान्य मीठापेक्षा कमी प्रमाणात सोडियम असते. तुम्ही या दोन्ही मिठाचा तुमच्या जेवणात समावेश करू शकता.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :