सातारा : सातारामध्ये (Satara Crime) पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर (Pune–Bengaluru Expressway) कराडच्या हद्दीत जळता मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. सध्या राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण सुरु असून त्यासाठी मोरी बांधण्याचे काम सुरु आहे. कराडच्या हद्दीत एका निर्माणाधीन मोरीमध्ये मृतदेह जळत असल्याचे सकाळी व्यायामासाठी जाणाऱ्या नागरिकांनी निदर्शनास आले. त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. 


खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पेटवण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज


पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी दुर्गंधीसह मृतदेह जळत असल्याचे समोर आले. नव्याने बांधण्यात येत असलेल्या मोरीत अर्धवट जळालेल्या अवस्थेत होता. मृतदेहाच्या शेजारी चप्पल असल्याने संबंधित मृतदेह पुरुषाचे असल्याचा कयास आहे. खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पेटवण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 


नवऱ्याचा खून करून हातपाय बांधून कालव्यात फेकले


दुसरीकडे, फलटणमध्ये (Satara Crime) धक्कादायक घटना अलीकडेच उघडकीस आली होती. शिवाजीनगरमधील बेपत्ता तरुणाचा खून झाल्याचे समोर आले होते. अजित बुरुंगले (वय 24) असे या तरुणाचे नाव आहे. त्याच्या पत्नीने प्रियकराच्या साथीने तसेच अन्य एकाच्या मदतीने खून केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी संशयित अजितची पत्नी शिवानी (वय 19), तिचा प्रियकर करण विठ्ठल भोसले (रा. थेऊर रोड, केसनंद, पुणे) या दोघांना अटक केली आहे.


बायकोच्या चौकशीत खुनाचा उलघडा 


रविवारी (17 सप्टेंबर) अजित घरातून कोणालाही माहिती न देता बेपत्ता झाल्याची तक्रार शहर पोलिस ठाण्यात दाखल होती. त्यानंतर दोनच दिवसांनी मंगळवारी गणेश चतुदर्थी दिवशी सकाळी विडणी (ता. फलटण) नीरा उजव्या कालव्यात हातपाय बांधलेल्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. त्यामुळे तरुणाचा खून पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह हातपाय बांधून टाकून देण्यात आल्याची शक्यता (Satara Crime) वर्तवण्यात येत होती. पोलिसांनी दाखल झालेल्या मिसिंग केसमधील तपशीलाच्या आधारावर तपास केला असतो तो मृतदेह अजितचा असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांचा आधार घेत पत्नी शिवानीकडे कसून चौकशी केली. चौकशीत शिवानीचे करणशी प्रेमसंबंध असल्याचे समोर आले. त्यामुळे प्रेमसंबंधात आणि लग्न करण्यात नवरा अडथळा वाटू लागला होता.


इतर महत्वाच्या बातम्या