Health Tips : सध्याच्या धकाधकीच्या जीवनात कामाचा ताण इतका वाढला आहे की लोक हसणं विसरत चालले आहेत. कामाच्या व्यापात लोक इतके व्यस्त झाले आहेत की, छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद हरवत चालला आहे. त्यासाठी त्यांना वेळच मिळत नाहीये. आनंदी राहणं आणि हसणं याचा संबंध थेट आपल्या आरोग्याशी असतो. अनेक संशोधनातून असं सिद्ध झालं आहे की, आपण जितके जास्त आनंदी राहू तितकी आपली तब्येत चांगली राहते. पण, मोठमोठ्या शहरांत कामाच्या वाढत्या तणावामुळे आनंदी राहणं तर दूरच पण लोक मोकळेपणाने हसूदेखील शकत नाहीयेत. 


आनंदी राहण्यासाठी तुमच्या शरीरात हार्मोन्सचं संतुलन असणं फार गरजेचं आहे. आपल्या शरीरात असे अनेक हार्मोन्स आहेत जे आनंदी राहण्यासाठी जबाबदार असतात. याला आपण 'हॅपी हार्मोन्स' (Happy Hormones) असं म्हणतो. जर तुम्हालाही तुमच्या आयुष्यातील तणावाला कमी करून खुश राहायचं असेल तर या ठिकाणी आम्ही तुम्हाला  काही खास टिप्स सांगणार आहोत. ज्याचा तुम्ही तुमच्या जीवनशैलीत वापर करू शकता. 


1. एंडोर्फिन हार्मोन (Endorphin Hormone)


एंडोर्फिन हार्मोनमुळे तुम्हाला शरीरात होणारं दु:ख कमी भासू लागतं. शरीरात हे हार्मोन वाढल्यामुळे तणावाची पातळी देखील कमी होते. तसेच तुमचा मूड देखील चांगला राहतो. तुम्हाला जर शरीरात हे हार्मोन वाढवायचं असेल तर चांगली झोप घ्या. त्याचबरोबर रोज नियमित व्यायाम करा. 


2. ऑक्सिटोसिन हार्मोन (Oxytocin Hormone)


हा मानवाच्या मेंदूमध्ये आढळणारा हार्मोन आहे. ऑक्सिटोनिन हार्मोन हा स्तनपान आणि प्रसूतीमध्ये मदत करणारा आहे. खरंतर, स्तनपाना दरम्यान हे हार्मोन अॅक्टिव्ह होते. ज्यामुळे बाळाला चांगलं आणि पुरेसं दूध देखील मिळते. या हार्मोनच्या माध्यमातून प्रेम आणि विश्वासाची भावना देखील वाढते जी आजच्या काळाची गरज आहे. शरीरात ऑक्सिटोनिन हार्मोनची पातळी वाढविण्यासाठी तुम्ही एकांतापासून दूर राहणं गरजेचं आहे. यासाठी जितकं तुम्हाला शक्य होईल तितका वेळ तुम्ही तुमच्या कुटुंबियांबरोबर घालवू शकता. तसेच, तुम्हाला ज्या कामातून आनंद मिळतो असं काम केल्यानेही ऑक्सिटोनिन हार्मोन वाढतो. 


3. डोपामाईन हार्मोन (Dopamine Hormone)


डोपामाईन हा शरीरातील सर्वात महत्त्वाच्या हार्मोन्सपैकी एक आहे. याच हार्मोन्सच्या माध्यमातून मेंदू आणि शरीरातील इतर अवयवांना संदेश पाठवला जातो. कोणत्याही कामावर लक्ष केंद्रित करण्यापासून ते एखादी गोष्ट लक्षात ठेवण्यापर्यंत डोपामाईन हार्मोन फार महत्त्वाची भूमिका बजावतात. शरीरात डोपामाईन हार्मोन वाढविण्यासाठी पुरेशी झोप मिळणं गरजेचं आहे. त्याचबरोबर प्रोटीनयुक्त आहाराचं सेवन देखील गरजेचं आहे.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :


Health Tips : सावधान! स्ट्रीट फूडमध्ये वारंवार वापरलं जाणारं तेल आरोग्यासाठी घातक; 'या' आजारांचा वाढता धोका