Fitness Tips : आजकाल आपल्या सर्वांच्याच जीवनशैलीत (Lifestyle) दिवसेंदिवस बदल दिसू लागले आहेत. यामध्ये कामाचा वाढता ताण आणि चुकीचा आहार यामुळे तर अनेकजण लठ्ठपणाचे बळी ठरतायत. फिट राहण्यासाठी अनेकजण जिममध्ये जातात खरं पण काही काळानंतर जिमला जाणं बंद केलं की पुन्हा लठ्ठपणा वाढू लागतो. अशा परिस्थितीत काही घरगुती कामांच्या मदतीने तुम्ही फिट राहू शकता. तसेच, तुमचा लठ्ठपणा दूर करू शकता. 


व्यस्त असल्यामुळे, बहुतेक लोक घरातील काम करण्यासाठी होम हेल्पर ठेवतात. यामुळे त्यांचा वेळ तर वाचतोच पण त्यांची जीवनशैली बिघडते. निरोगी राहण्यासाठी फक्त हेल्दी खाणं आवश्यक नाही तर तुमच्या जीवनशैलीत काही चांगले बदल करणेही गरजेचे आहे. यासाठी तुम्हाला घरातील काही कामे स्वतः करावी लागतील. तंदुरुस्त राहण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे.


'ही' कामे तुम्हाला तंदुरुस्त राहण्यास मदत करू शकतात 


घर स्वच्छ करा


घर स्वच्छ करणं यापेक्षा चांगला व्यायाम नाही. यामुळे तुमच्या संपूर्ण शरीरात रक्ताभिसरण वाढते आणि तुम्ही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहता. खरंतर, साफसफाई करताना तुमचे हात आणि पाय सतत सक्रिय राहतात. घराची साफसफाई करणे हे मेहनतीचं काम आहे. ज्यामध्ये तुमचे संपूर्ण शरीर योगदान देते, ज्यामुळे शरीरातील अतिरिक्त फॅट बर्न होते.


बागकाम करा


घराच्या आत आणि बाहेर झाडे लावल्याने घराची शोभा तर वाढतेच शिवाय मानसिकदृष्ट्याही आपण फिट राहतो. अनेक संशोधनांमध्ये असे आढळून आले आहे की, बागकामामुळे काही लोकांना तणाव कमी होण्यास मदत होते. लहान मुलांप्रमाणे रोपांची काळजी घ्यावी लागते, त्यासाठी खूप मेहनत करावी लागते, या कामांमध्ये शरीराचा सहभाग घेतल्याने स्नायू मजबूत होतात. या व्यतिरिक्त, ते अतिरिक्त कॅलरी देखील बर्न करतात. 


जिना चढणे


जर तुम्हाला वर्कआउटसाठी बाहेर जायचं नसेल तर घरच्या पायऱ्या चढून तुम्ही वजन कमी करू शकता. हे फिटनेससाठी सर्वोत्तम मानले जाते. यासाठी दररोज 10-15 मिनिटे हा व्यायाम करा. हा व्यायाम रोज केल्याने तुमचे पाय मजबूत होतील आणि जर तुम्हाला पाय दुखण्याची तक्रार असेल तर ती देखील दूर होईल.


मशीनऐवजी हाताने कपडे धुवा


वेळेअभावी मोठ्या शहरांमध्ये जवळपास प्रत्येक घरात कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीनचा वापर लोक करतात. यामुळे तुमचा वेळ वाचतो. पण, जर तुम्हाला तुमच्या पोटाची चरबी कमी करायची असेल, तर तुमचे कपडे मशीनऐवजी हाताने धुवा.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :


Health Tips : 'या' 7 लोकांच्या आहारात माशांचा समावेश नक्की असावा; हाडांच्या तंदुरुस्तीसह अनेक आजारही होतील दूर