Health Tips : जर तुम्ही तुमच्या सवयींमध्ये थोडासा बदल केला तर कोणताही ऋतू तुमचे नुकसान करू शकत नाही. तुमचे आरोग्य नेहमीच चांगले राहील. थंडीमुळे होणारे आजार असोत किंवा पावसामुळे होणारे संसर्ग, ते तुमच्यापासून दूर राहतील. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, अचानक वेगाने बदलणाऱ्या हवामानामुळे लोकांच्या शारीरिक आरोग्याबरोबरच त्यांच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. उच्च रक्तदाब, रक्तदाब, मूड बदलणे, श्वासोच्छवासाशी संबंधित समस्या उद्भवू लागतात. चला जाणून घेऊयात अशाच 5 टिप्स, ज्याचा अवलंब करून तुम्ही व्हायरल, ताप, सर्दी आणि खोकल्यापासून दूर राहाल.
 
शारीरिक हालचाल करा


हिवाळ्याच्या सीझनमध्ये, बहुतेक लोक सर्दी आणि आजारांमुळे शारीरिक हालचाली कमी करतात. तर असे करू नका. जे लोक रोज व्यायाम, योगासने किंवा शारीरिक हालचाली करतात त्यांची प्रतिकारशक्ती देखील मजबूत राहते.
 
आहाराची काळजी घ्या


हिवाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याचे अनेक पर्याय असतात, हे सर्वच आरोग्यदायी नसतात. त्यामुळे बदलत्या ऋतूंमध्ये आहाराची काळजी घेणे सर्वात महत्त्वाचे आहे. घरचे ताजे अन्न खा, जंक फूडपासून दूर राहा आणि भरपूर पाणी प्या.


प्रतिकारशक्तीची काळजी घ्या


बर्‍याच प्रकरणांमध्ये, असे दिसून आले आहे की, रोग प्रतिकारशक्ती चांगली असलेल्या लोकांना हवामानातील रोगांचा फारसा परिणाम होत नाही. अशा परिस्थितीत आपली प्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यासाठी. मध, गरम पाण्यात किंवा दुधात हळद अवश्य वापरावी.  
 
उबदार कपडे घाला


साधारणपणे, सूर्य उगवताच लोक उबदार कपडे वापरण्यास सुरुवात करतात, म्हणजे हिवाळ्यातील उबदार कपडे कमी किंवा गरजेनुसार वापरतात. परंतु असे करू नका. अचानक कमी होणारी थंडी अचानक वाढू शकते, ज्यामुळे अनेक लोक आजारांना बळी पडतात. त्यामुळे हिवाळ्यात अत्यंत जपून उबदार कपडे वापरा आणि निरोगी राहा.
 
फ्लूची लस घ्या


अचानक बदललेल्या हवामानामुळे आजारी पडणारे बहुतेक लोक कमकुवत प्रतिकारशक्तीमुळे आजारी पडतात. अशा परिस्थितीत त्यांच्यासाठी फ्लूची लस घेणे हा एक प्रकारचा प्रभावी उपाय ठरू शकतो. वृद्ध लोक, मधुमेह, साखर, उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या व्यक्तींनी वर्षातून एकदा फ्लूची लस अवश्य घ्यावी जेणेकरून ते हवामानातील आजारांपासून काही प्रमाणात बचाव करू शकतील.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्त्वाच्या बातम्या :


Health Tips : गुलाबी थंडीत 'या' चहाने तुमच्या दिवसाची सुरुवात करा; प्रतिकारशक्ती वाढविण्याबरोबरच व्हायरलपासूनही संरक्षण मिळेल