Health Tips : आजकाल, कामाचा वाढता ताण आणि वेळेच्या अभावामुळे बहुतेक लोक एंग्जायटी आणि पॅनिक अटॅकचे (Panic Attack) बळी ठरत आहेत. याबरोबरच कामाचं दडपण आणि इतरांपेक्षा पुढे राहण्याची स्पर्धा यामुळे लोक हळूहळू कळत-नकळत तणावाचे बळी ठरत आहेत. पॅनिक अटॅक हा सामान्य तणावासारखा दिसतो पण त्याचं हळूहळू मानसिक आरोग्य समस्येत रूपांतर होतं. त्यामुळे लोक एंग्जायटी (Anxiety) आणि पॅनिक अटॅकचे बळी ठरत आहेत. बदलत्या काळानुसार, एंग्जायटी आणि पॅनिक अटॅकने ग्रस्त रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. पण हे दोघे समान आहेत की वेगळे? या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
खरंतर, लोक पॅनिक अटॅक आणि एंग्जायटी यांना एक समजण्याची चूक करतात. पण, हे दोन्ही एकमेकांपासून खूप वेगळे आहेत. बर्याच वेळा लोक एंग्जायटीसा पॅनिक अटॅक म्हणतात. तर त्याची लक्षणे पूर्णपणे भिन्न असतात. पॅनिक अटॅक आणि एंग्जायटी यातील फरक जाणून घेऊयात.
एंग्जायटी अटॅकची लक्षणे कोणती?
- हृदयाचे ठोके अचानक वाढणे
- अचानक जास्त घाम येणे
- हातात थरथरणे
- विनाकारण भीती वाटणे
- श्वास घेण्यास त्रास होणे
पॅनिक अटॅक म्हणजे काय?
पॅनिक अटॅक हा एंग्जायटी अटॅकपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. याचा कोणत्याही जुन्या अपघाताशी संबंध नाही. हा अचानक येणारा अटॅक आहे. त्याचा परिणाम शरीरावर फार लवकर दिसून येतो. एखाद्याला गमावण्याच्या भीतीमुळे कधीकधी तुम्हाला पॅनिक अटॅक येऊ शकतो. हा एक प्रकारचा फोबिया आहे जो कोणत्याही व्यक्तीला कधीही होऊ शकतो.
पॅनिक अटॅकची लक्षणे
1. रक्तदाब वाढणे 2. उलट्या होणे 3.अचानक घाम येणे 4. भीती वाटणे 5.हृदयाचे ठोके वाढणे
पॅनिक अॅटॅक आणि अॅन्झायटी अॅटॅकची लक्षणे सारखी असू शकतात. पण, जी व्यक्ती या परिस्थितीतून जाते. त्यांच्यातील फरक आपण चांगल्या प्रकारे समजू शकतो. पॅनिक अटॅक तुमच्यावर कधीही येऊ शकतो, तर एंग्जायटी अटॅक हळूहळू सुरू होतो आणि नंतर तीव्र स्वरूप धारण करतो. पॅनिक अटॅक भीतीमुळे होतो तर एंग्जायटी अटॅक तणावामुळे होतो.
पॅनिक अटॅक म्हणजे काय?
काही तीव्र वेदना किंवा अस्वस्थतेमुळे पॅनिक अटॅक प्रत्यक्षात येतो. एखाद्या जुन्या घटनेचा वारंवार विचार करून तुम्हाला ताण येऊ लागला तर ते अॅन्झायटी अटॅकचे कारण ठरू शकते. बर्याच वेळा, जेव्हा आपण खूप ताण घेतो तेव्हा स्नायूंवर जास्त ताण आल्याने अटॅकचा धोका वाढतो. जुना अपघात, किरकोळ आघात किंवा गंभीर परिस्थितीमुळे पॅनिक अटॅकची समस्या उद्भवू शकते.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.