Health Tips : साखर ही एक अशी गोष्ट आहे की ज्याचा वापर केला जात नाही असे जगातील क्वचितच कोणते घर असेल. बिस्किट, चहा, मिठाई, आईस्क्रीम, खीर असे अनेक गोडाचे पदार्थ आहेत जे साखरेशिवाय पूर्ण होत नाहीत. पदार्थांची चव वाढविण्यासाठी साखरेचा वापर केला जातो. मात्र, अति प्रमाणात साखरेचं सेवन तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. जाणून घ्या साखरेचे दुष्परिणाम.
जास्त साखर खाल्ल्याने कोणते आजार होतात आणि त्याची लक्षणे?
हृदयरोगाचा धोका
जास्त साखर खाल्ल्यामुळे हृदयाच्या धमनीच्या जवळपासच्या स्नायूंच्या ऊतींचा सामान्यपेक्षा जास्त विस्तार होऊ लागतो. त्यामुळे उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.
शरीरात खराब कोलेस्ट्रॉल वाढू लागते
अनेक संशोधनांमध्ये हे समोर आले आहे की, जास्त प्रमाणात साखर खाल्ल्याने शरीरात खराब कोलेस्ट्रॉल वाढू लागते. जे शरीरासाठी धोकादायक ठरू शकते. साखर ही अशी गोष्ट आहे जी शरीरातील निरोगी कोलेस्टेरॉल कमी करून वाईट कोलेस्टेरॉल वाढवू शकते.
अल्झायमरचा धोका
जास्त साखर खाल्ल्याने अल्झायमरचा धोका वाढतो. अल्झायमर हा एक गंभीर आजार आहे. ज्यामध्ये मेंदूची ग्लुकोज प्रक्रिया करण्याची क्षमता संपते.
फॅटी लिव्हरची समस्या
जास्त साखर खाल्ल्याने नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हरचे आजार होतात. यामध्ये लिव्हरमध्ये चरबी जमा होते.
लठ्ठपणाची समस्या
जास्त साखर खाल्ल्याने शरीरात ग्लुकोजची कमतरता होते. त्यामुळे माणसाला जास्त भूक लागते आणि वजन वाढू लागते.
साखर खाण्याचे व्यसन शरीर खराब करू शकते, जाणून घ्या त्याची सुरुवातीची लक्षणे
त्वचेचे नुकसान
सर्वप्रथम, जास्त साखर खाल्ल्याने तुमची त्वचा खराब दिसू लागते. त्वचेवर पिंपल्स, डाग दिसू लागतात. जर तुमच्या त्वचेवरही असे काही दिसत असेल तर काळजी घ्या.
सतत वजन वाढते
तुम्ही साखर खाणे सोडले नाही, तर तुमच्या डाएटिंगवर त्याचा परिणाम होतो. आहारतज्ञ अनेकदा फिटनेससाठी तुम्हाला मीठ आणि साखर सोडण्याचा सल्ला देतात.
आळस आणि थकवा
तुम्हाला नेहमी सुस्त आणि थकल्यासारखे वाटत असेल किंवा कोणतेच काम करायची इच्छा नसेल तर समजून घ्या की यामागे साखर हे एक कारण असू शकते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या बातम्या :