Health Tips : आपल्या जेवणात सर्व पदार्थांत मिठाचा वापर केला जातो. मिठामुळे जेवणाला चव येते, पण मिठाचं अधिक सेवन आरोग्यासाठी घातक ठरु शकतं. मिठाचे काही फायदेही आहेत. जसे की, रक्तातील साखरेची पातळी राखली जाते. पण, असं म्हणतात ना की कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हानिकारक असतो. त्याचप्रमाणे, मिठाच्या अतिसेवनाने हृदयविकार, रक्तदाब यांसारख्या अनेक समस्या उद्भवू शकतात. अति मिठाच्या सेवनामुळे रक्तदाब वाढू शकतो आणि हृदय आणि मूत्रपिंडाचे आजार होऊ शकतात. त्यामुळे एका दिवसात 5 ग्रॅमपेक्षा जास्त मीठ न खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. 


पाणी टिकवून ठेवण्यास मदत :


सामान्यत: काही प्रमाणात सोडियम किडनीमध्ये आढळते. त्यामुळे जेव्हा तुम्ही तुमच्या शरीरात जास्त सोडियमचं सेवन करता तेव्हा किडनीला  जास्त पाणी साठवून ठेवावे लागते. शरीरात क्षाराचे प्रमाण जास्त असताना पाण्याची गरज असते. या स्थितीला वॉटर रिटेन्शन असे म्हणतात. अशा स्थितीत हात,पाय आणि चेहऱ्यावर सूज येते.


बीपीची समस्या :


जास्त काळ मीठ खाल्ल्याने उच्च रक्तदाब वाढू शकतो. ज्यामुळे रक्तवाहिन्या आकुंचन होऊ शकतात. यासोबतच उलट्या, मळमळ आणि अशक्तपणा यांसारखी लक्षणे दिसू लागतात. 


जास्त तहान लागते :


मीठ जास्त असलेले अन्न खाल्ल्याने आपल्याला वारंवार तहान लागते. ज्यामुळे आपल्याला वारंवार लघवी होऊ शकते. मिठात सोडियमचं प्रमाण जास्त असल्याने या समस्या उद्भवतात. यामुळे हायपरनेट्रेमिया होतो." हायपरनेट्रेमियावर वेळीच उपचार न केल्यास मृत्यू देखील होऊ शकतो.


वारंवार डोकेदुखी :


जास्त मीठ खाल्ल्याने डिहायड्रेशनमुळे वारंवार डोकेदुखी होऊ शकते. यामुळे मायग्रेन देखील होऊ शकतो. अशा परिस्थितीत, हा त्रास टाळण्यासाठी, भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे.


जास्त मीठ सेवन केल्याने अनेक आजारांना आमंत्रण


मीठ 40 टक्के सोडियम आणि 60 टक्के क्लोराईडने बनलेले असते. सोडियम आणि क्लोराईड शरीरातील पाणी आणि खनिजांचे संतुलन राखण्याचे काम करतात. पण जर मिठाचं जास्त प्रमाणात सेवन केले गेले तर शरीराला खूप नुकसान होऊ शकतं. जास्त मिठाच्या सेवनामुळे रक्तदाब, पोटाचा कर्करोग, किडनीचे आजार, हृदयविकार, अकाली मृत्यू यांसारखे जीवघेणे आजारही होऊ शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. 


महत्वाच्या बातम्या : 


Health Tips : तांदळाचे जसे फायदे तसे तोटेही; जाणून घ्या अति प्रमाणात भात खाण्याचे दुष्परिणाम