Cinnamon For Cholesterol : रोजच्या धावपळीच्या जीवनात आरोग्याकडे अनेकदा आपल्याला लक्ष देणे होत नाही. आरोग्याकडे दुर्लक्ष झाले की, अनेक आजार मागे लागतात. कोलेस्ट्रॉल (Cholesterol) वाढण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे व्यायाम आणि नियमीत चालणे थांबवणे. अनेक लोक आहारात जंक फूड (Junk Food) खातात. फॅटयुक्त अन्न खाल्ल्याने शरीरातील चरबी कमी होऊ लागते. त्याचा परिणाम रक्तवाहिन्यांवरही दिसून येतो.   कोलेस्ट्रॉलच्या उच्च पातळीमुळे, रक्त पेशी कमी होऊ लागतात, ज्यामुळे रक्तवाहिन्यांमधील रक्त प्रवाह बराच कमी होतो. यामुळे हृदयविकाराचा झटका देखील येऊ शकतो. शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणाबाहेर राहिल्यास ब्रेन स्ट्रोक देखील होऊ शकतो. खरं तर, कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे मेंदूपर्यंत रक्ताभिसरण होत नाही, त्यामुळे पॅरिलिसीस होण्याची शक्यता असते. तसेच कोलेस्ट्राॅल वाढले की, तुम्हाला पाय दुखण्याच्या समस्या येतात आणि तुम्हाला सतत थकवा जाणवतो. 


दालचिनी खाण्याने कोलेस्ट्राॅल नियंत्रणात येते


दालचिनीचा (Cinnamon) वापर रोजच्या आहारात केल्यास शरीरात वाढलेले कोलेस्ट्राॅल नियंत्रणात येण्यास मदत होते. दालचिनीचे आयुर्वेदात मोठे महत्व आहे. दालचिनी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. दालचिनीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळून येतात. दालचिनीमध्ये आढळणारे सिनामल्डीहाइड आणि सिनामिक ॲसिड खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. दालचिनीचे नियमित सेवन केल्याने ब्लड सर्क्युलेशन सुधारते आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो. 


रोजच्या आहारात तुम्ही दालचिनीचा वापर करू शकता. ज्यामध्ये तुम्ही दालचिनीचा वापर तुम्ही चहामध्ये करू शकता. तसेच भाजी बनवताना देखील याचा वापर करता येऊ शकता. रोज सकाळी रिकाम्या पोटी दालचिनी पावडर आणि गरम पाणी पिऊन तुम्ही शरीरातील कोलेस्ट्राॅल नियंत्रणात आणू शकता. मात्र दालचिनीचे अतिसेवन तुमच्या आरोग्याचे नुकसानही करू शकते. सोबतच मध आणि दालचिनी तसेच दुधात दालचिनीची पावडर मिसळूनही तुम्ही पिऊ शकता. 


जर तुम्ही असा आहार घेतला ज्यामध्ये सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण जास्त असेल तर रक्तातील एलडीएल (LDL) किंवा खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते. मांस, दुग्धजन्य पदार्थ, अंडी, खोबरेल तेल, पाम तेल, लोणी, चॉकलेट, तळलेले पदार्थ, प्रक्रिया केलेले पदार्थ आणि बेकरी प्रोडक्ट्स कोलेस्ट्रॉल वाढवू शकतात, त्यामुळे या गोष्टी टाळून तुम्ही स्वतःला खराब कोलेस्ट्रॉलपासून दूर ठेवू शकता.


 


इतर महत्वाच्या बातम्या