World Chocolate Day Recipes : आज जागतिक चाॅकलेट दिन. लहानांपासून मोठ्या पर्यंत सर्वांनाच चाॅकलेट खायला आवडते. कोणताही शुभ प्रसंग असू अनेकदा चाॅकलेटचा बाईट खायला दिला जातो. आजकाल दिवाळी, वाढदिवस ,ख्रिसमस , रक्षाबंधन किंवा गिफ्ट  म्हणून तसेच अगदी मैत्रीत हात पुढे करण्यापासून ते प्रेम व्यक्त करायचे असल्यास देखील चाॅकलेटचा बाॅक्स दिला जातो. घरातील लहान मुलांचे तोंड गोड करण्याचा हा एक उत्तम पर्याय असू शकतो. आजच्या या चाॅकलेट डेला तुम्हालाही चाॅकलेट खाऊन सेलिब्रेट करायचे असल्यास या काही रेसेपी तुम्ही घरच्या घरी ट्राय करू शकता.


क्लासिक चॉकलेट फोंडंट सामग्री


113 grams डार्क चाॅकलेट


1/2 कप अनसाल्टेड बटर


1 कप पिठीसाखर


2 मोठी अंडी


2 अंड्याचा बलक


1/2 टीस्पून व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट


1/4 कप मैदा


चिमूटभर मीठ


कोको पावडर


क्लासिक चॉकलेट फोंडंट बनवण्याची कृती


- सुरुवातीस ओव्हन 220°C गरम करून घ्या. मैद्याच्या पीठाला लालसर  रंग येईपर्यंत ते त्यात ठेवा.


- यानंतर एका हिटप्रुफ बाऊलमध्ये डार्क चाॅकलेट आणि अनसाल्टेड बटर गरम पाण्यात मिसळत राहा. आता या मिश्रणाला थंड होण्याकरता ठेवा.


- आता एका वेगळ्या पातेल्यात पिठी साखर, अंडी, अंड्यातील  बल्क आणि व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट एकत्र होईपर्यंत त्याला हलवत राहा.


- या मिश्रणात गरम केलेले मैद्याचे पीठ हळू हळू मिसळा.


- हे तयार झालेले सर्व मिश्रण 10-12 मिनीटांकरता ओव्हनमध्ये ठेवा. 


- तयार झालेले क्लासिक चॉकलेट फोंडंट ओव्हन मधून बाहेर काढा आणि थोडे थंड होण्याकरता ठेवा.


- डिशला डेकोरेट करण्याकरता त्यावर कोको पावडर आणि चाॅकलेटचे लहान लहान तुकडे टाका.


चेरी बेरी चॉकलेट व्हीप्ड सामग्री


1 कप क्रिम


1/4 कप पिठीसाखर


1/2 टीस्पून व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट


1/4 कप डार्क चॉकलेट


1/2 कप चेरी


1/2 कप सर्व प्रकारच्या बेरी (स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, रास्पबेरी)


चेरी बेरी चॉकलेट व्हीप्ड बनवण्याची कृती


- एका पातेल्यात क्रिम , पिठीसाखर आणि व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट एकत्र करून घ्या.


- हे मिश्रण मिक्सरवर पूर्ण बारीक करून घ्या.


- मायक्रोवेव्हमध्ये डार्क चाॅकलेट वितळून घ्या.


- हळुहळू वितळलेले चॉकलेट व्हीप्ड क्रीम मिश्रणात घाला. 


- आता एका पॅनमध्ये तुम्हाला हव्या असतील तेवढ्या चेरी आणि बेरी पसरवून ठेवा आणि त्यात आता हे तयार केलेले मिश्रण ओता.


- तयार झालेले चेरी बेरी चॉकलेट व्हीप्ड हळूवार उचलून एका बाऊलमध्ये घ्या आणि ते सर्व्ह करा.


चाॅकलेट करंजी बनवण्यासाठीची सामग्री


1 कप रवा


1 कप मैदा


1/4 कप गरम तेल (मोहन)


मीठ चवीला


2 कप खवा


1 कप पिठीसाखर


1/4 कप डार्क चॉकलेट


1/4 कप काजू-बदाम तुकडे (भरड)


1 टी स्पून वेलचीपूड


कारंजी तळण्यासाठी तूप


चाॅकलेट करंजी बनवण्यासाठीची कृती


- मैदा, मीठ, गरम तूप मिक्स करून पीठ घट्ट माळून 2 तास बाजूला ठेवा. त्याचे एक सारखे गोळे बनवा.


- खवा किसून घ्या. मग त्यामध्ये पिठीसाखर, ड्रिकिंग चॉकलेट पावडर, काजू-बदाम , वेलची पावडर घालून मिक्स करून सारण तयार करून घ्या.


- एक एक गोळा घेवून पुरी सारखे लाटा व त्या पुरीला कडेनी थोडेसे दुध लावा आणि 1 टीस्पून सारण भरून पुरी बंद करून त्याला मधोमध घडी घाला. असे दोन वेळा करा.अश्या सर्व करंज्या बनवून घ्या. बनवत असतांना ओल्या कापडा मध्ये ठेवा म्हणजे त्या सुकणार नाहीत. 


- कढईमधे तूप गरम करून करंज्या तळून घ्या.


 


इतर महत्वाच्या बातम्या


World Chocolate Day 2023 : 'चॉकलेट डे' साजरा करून वाढवा तुमच्या नात्यातील गोडवा; मित्र-मैत्रिणींना द्या 'या' खास शुभेच्छा!